Solapur News: टिपेश्वर अभयारण्यातून धाराशिव तालुक्यातील रामलिंग अभयारण्यात वाघ येऊन एक वर्ष उलटले. १९ डिसेंबर २०२४ रोजी अभयारण्यालगत ढेंबरेवाडी (ता. बार्शी) येथे तो पहिल्यांदा कॅमेऱ्यात ट्रॅप झाला होता. धाराशिव व बार्शी तालुक्यात सर्वाधिक राहणारा हा वाघ बीड, अहिल्यानगर व लातूर जिल्ह्यांपर्यंत वावरतो. त्याने आजवर एकाही माणसावर हल्ला केलेला नाही..यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून मे २०२३ पासून बेपत्ता असलेला बछडा १९ डिसेंबर २०२४ रोजी येडशी वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाला. त्या वेळी तो अंदाजे अडीच वर्षांचा होता. आता त्याचे रूपांतर प्रौढ वाघात होत असून त्याने याच परिसरात स्वत:चा अधिवास (टेरिटरी) तयार केला आहे..Yedshi Sanctuary Tiger : येडशी अभयारण्यातून वाघ बेपत्ता, वनविभागाची शोधमोहीम सुरू.निम्नप्रौढ असलेल्या बछड्याने सुरुवातीच्या काळात अवघ्या २३ दिवसांत १३ पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते. मात्र पुढील काळात हे प्रमाण कमालीचे घटले असून त्यानंतर त्याने आपली उपजीविका रानडुकरे, हरिण, काळवीट, नीलगाय अशा शेतकऱ्यांच्या पिकावर डल्ला मारणाऱ्या प्राण्यांना मारून केली आहे. यामुळे सुरुवातीला घाबरून गेलेले या परिसरातील शेतकरी वाघामुळे रानडुकरांचा त्रास कमी होत असल्याचे सांगत आहेत..ठळक बाबीवाघाचे कमी वयात मोठे स्थलांतर; सुरुवातीला अधिक हल्लेकायम स्वत: लपविण्यात माहिर; अत्यंत कमी वेळा प्रत्यक्ष दर्शनवन खात्याचा प्रारंभी पकडण्याचा प्रयत्न मात्र नंतर आहे तिथे राहू देण्याचा निर्णययेडशी- बार्शी एकत्रित मोठे अभयारण्य झाल्यास एका वाघाचा अधिवास सहज शक्य.Isapur Wildlife Sanctuary : शेतकऱ्यांच्या २२० हेक्टर शेतजमिनी पडीक.वाघाच्या हल्याच्या वनविभागाकडील नोंदीबार्शी तालुक्यात आजवर लाढोळे, मुंगशी (आर.), राळेरास, ज्योतिबाची वाडी, वैराग, सासुरे, उक्कडगाव, भालगाव, ढेंबरेवाडी, कोरेगाव, ढोराळे, उपळे (दु.) धामणगाव (दु.) या गावात वाघाने हल्ले केलेले आहेत. यापैकी काही गावात एकापेक्षा अधिक हल्ले झालेले आहेत..अत्यंत हुशार व शांत वाघाने वर्षभराहून अधिक काळ सोलापूर- धाराशिव सीमेवर काढला आहे. हा वाघ बीड, अहिल्यानगर, लातूर सीमेवरही फिरून परत आला आहे. पाच जिल्ह्यांत त्याचा वावर असला, तरी त्याचे मुख्य ठिकाण रामलिंग अभयारण्य आहे.- अमोल मुंडे, वन परिक्षेत्र अधिकारी, पूर्वी येडशी, सध्या- बीड जिल्हा.बार्शी तालुक्यात वर्षभरात एकूण ३५ जनावरे ठार झालेली असून, १७ हल्ले वाघाचे असून इतर हल्ले बिबट व लांडग्याचे आहेत. एकूण सर्व हल्ल्यांतून मृत झालेल्या प्राण्यांच्या नुकसान भरपाईसाठी ११ लाख ४८ हजार रुपयांची भरपाई वितरित झालेली आहे.- अलका करे, वन परिक्षेत्र अधिकारी, बार्शी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.