Dharashiv News : जूननंतर अधूनमधून झालेल्या पावसावर खरीप हंगामातील पीक बहरले होते; मात्र मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने ‘एका रात्रीत व्हत्याचं नव्हतं झालं’, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत..धाराशिव तालुक्यातून वाहणाऱ्या तेरणा नदीच्या परिसरात या वर्षी सुरवातीपासूनच चांगला पाऊस झाला. शेतकऱ्यांचा आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाने तेरणा पट्ट्यातील शेतशिवार फुलून गेले होते. काहींच्या शेतातील सोयाबीनला फुले लगडली होती. तर, काही ठिकाणी सोयाबीनला शेंगा आल्या होत्या. .Crop Damage Survey : अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू.पिके बहरात असल्याने शेतकरी आर्थिक गणित जुळवत होते; मात्र १४ व १५ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा नदीच्या पट्ट्यातील पिके आडवी झाली. एकाच रात्रीत होत्याचं नव्हतं झालं अन् तेरणेच्या पाण्याबरोबर शेतकऱ्यांची स्वप्ने पाण्याबरेबर वाहून गेली..Rain Crop Damage : साहेब, आता सगळं संपलं; शेतात फक्त पाणीच पाणी.अशी भयानक परिस्थिती तालुक्यातून वाहणाऱ्या तेरणा नदीकाठच्या जवळपास ४० गावांतील शेतकऱ्यांची झाली आहे. .तेरणा नदीपात्राशेजारी माझी अडीच एक्कर शेती आहे. मी सोयाबीनचे पीक घेतले होते. पीक देखील जोमात बहरले होते. यावर्षी कीड किंवा गोगलगायींची पिकांना बाधा नव्हती. त्यामुळे यंदा सोयाबीन पदरात भरभरून पडेल अशी आशा होती; मात्र एकाच रात्रीत सर्वच चित्र पालटले आणि सगळे पीकच पाण्याखाली गेले.- हमीदखां पठाण, दुधगाव.तेरणा नदीच्या पट्ट्यातील सुमारे तीस ते चाळीस गावांतील शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद, मूग पिकाचे नुकसान झाले. काही ठिकाणी वाहून गेली आहे. तर, काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली आहेत. चाळीस टक्के शेतीचे पंचनामे झाले असून, आतापर्यंत सुमारे अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.- महेश देवकते, तालुका कृषी अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.