Solapur News: चालू २०२५-२६ गाळप हंगामात सोलापूर जिल्ह्यात १६ नोव्हेंबरअखेरपर्यंत १४ लाख ३१ हजार ७६४ मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून ९ लाख ८१ हजार २७५ क्विंटल साखर तयार झाली आहे. पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने या वर्षी गाळप व साखर उत्पादनात आघाडी घेत तीन लाख टन ऊस गाळपाचा टप्पा गाठला आहे..या हंगामासाठी जिल्ह्यातील ३३ पैकी १६ साखर कारखान्यांनी साखर आयुक्तालयाकडे दैनंदिन अहवाल सादर केले. यात ८ सहकारी आणि ८ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. सहकारी कारखान्यांनी एकूण ९,७७,१२४ टन ऊस गाळप करून सरासरी ७ टक्के उताऱ्याने ६,८४,४०५ क्विंटल साखर उत्पादित केली आहे..Crushing Season: लोकशक्ती पहिल्या गाळप हंगामासाठी सज्ज.याउलट खासगी कारखान्यांनी ४,५४,६४० टन ऊस गाळप करून सरासरी ६.५५ टक्के उताऱ्याने २,९६,८७० क्विंटल साखर तयार केली असून ते मागे पडल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील सहकार महर्षी, विठ्ठल (वेणूनगर), पांडुरंग या तीन कारखान्यांनी दीड लाख टनांहून अधिक गाळप केले आहे. .करकंब येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने एक लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे. १ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हंगाम सुरळीत सुरू असून, लवकरच गाळपाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. साखर उताऱ्याची स्थिती समाधानकारक असली, तरी काही खासगी कारखान्यांचा गाळप वेग मंदावल्याचे चित्रही दिसून येत आहे..जिल्ह्यातील १६ नोव्हेंबरपर्यंतचे गाळप व साखर उत्पादन: साखर कारखाना गाळप (टन) साखर उत्पादन (क्विंटल)विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर २,८८,३०६ १,४८,०००विठ्ठल, वेणूनगर १,८०,११५ १,४१,९००पांडुरंग १,५२,९३७ १,२९,४५०सहकार महर्षी १,४८,०६९ १,१७,१५०विठ्ठलराव शिंदे, करकंब १,०६,८१३ ८३,०५०युटोपियन ८४,३७४ ४३,९००व्ही.पी. शुगर्स ७२,०५१ ४४,३५०सीताराम महाराज ७१,५९३ ५०,३००भैरवनाथ, आलेगाव ५५,०११ ४१,८००.सासवड माळी ५३,४७० ३७,८२०श्री. शंकर ४४,६३० ३०,०००आष्टी शुगर ४०,६७५ २८,१५०सिद्धनाथ ३९,९८० २५,४००येडेश्वरी ३७,४८६ २५,१५०धाराशिव, सांगोला ३६,९५० २५,७५०संत कुर्मदास १९,३०५ ९,१०५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.