देशातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात वाढ देशातील १६१ प्रमुख धरणांपैकी ६० टक्के धरणांमध्ये सुमारे ९० टक्के पाणीसाठा प्रत्येक चार धरणांपैकी एक धरण भरले आहेमहाराष्ट्रातील १९ धरणे पूर्ण भरली आहेत.Water Storage: यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने देशातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) आकडेवारीनुसार, देशातील १६१ प्रमुख धरणांपैकी ६० टक्के धरणांमध्ये या आठवड्यात सुमारे ९० टक्के पाणीसाठा होता. याचाच अर्थ, प्रत्येक चार धरणांपैकी एक धरण भरले आहे..१६१ धरणांत पाणीसाठा १८२.४९६ अब्ज घनमीटर (BCM) क्षमतेच्या तुलनेत १६५.३१२ अब्ज घनमीटर म्हणजेच ९०.६ टक्के आहे. हा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ४ टक्के अधिक आहे. तर सामान्यपेक्षा (गेल्या १० वर्षांच्या पातळीच्या) सुमारे १५ टक्के अधिक आहे. एकूण ४४ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत..Marathwada Water Storage : मराठवाड्यात उपयुक्त पाणीसाठा ९५ टक्क्यांवर .तर ५२ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. महाराष्ट्रातील १९ धरणे पूर्ण भरली आहेत. तर मध्य प्रदेश, झारखंड आणि गुजरातमधील प्रत्येकी तीन धरणे पूर्ण भरली आहेत. राजस्थानमधील ३ धरणे, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामधील प्रत्येकी दोन, छत्तीसगड आणि कर्नाटकमधील प्रत्येकी एक धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. याशिवाय, गोवा आणि मिझोरममध्ये असलेले प्रत्येकी एक धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे..२७ टक्के अतिरिक्त पाऊसभारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, देशात मान्सूननंतर १ आणि १६ ऑक्टोबर रोजी २७ टक्के अधिक पाऊस पडला. मान्सूनच्या कालावधीत झालेल्या पावसाव्यतिरिक्त हा ८ टक्के अतिरिक्त पाऊस आहे..दक्षिण द्वीपकल्पात पावसाचे प्रमाण १४ टक्के कमी राहिले. तर वायव्य भागात २१५ टक्के, पूर्व आणि ईशान्य भारतात २८ टक्के आणि मध्य भारतात १३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. देशातील ७३० जिल्ह्यांमधील आकडेवारीवरून असे दिसून आले की या कालावधीत देशातील २६ टक्के भागात कमी पाऊस पडला..Monsoon Rain Update: ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार.पश्चिम भागात ३७.३५७ अब्ज घनमीटर क्षमता असलेल्या ५० धरणांत ३६.३६५ अब्ज घनमीटर म्हणजेच ९७.३४ टक्के एवढा सर्वाधिक पाणीसाठा झाला आहे. गुजरातमध्ये पाणीसाठ्याचे प्रमाण ९५.९७ टक्के आणि महाराष्ट्रात ९८.६० टक्के एवढे आहे..मध्य भारतातील २८ धरणांत ४८.५८८ अब्ज घनमीटर क्षमतेच्या ४४.४७६ अब्ज घनमीटर म्हणजेच ९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मध्य प्रदेशातील धरणांमध्ये ९६ टक्के, तर उत्तराखंडमध्ये ९३ टक्के पाणीसाठा आहे. छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशातील धरणांत अनुक्रमे ८८ टक्के आणि ७७ टक्के पाणीसाठा आहे. .दक्षिण भारतातील ४६ धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊन तो सुमारे ९० टक्क्यांवर गेला आहे. आंध्र प्रदेशात ९३.६ टक्के आणि तेलंगणात ९१ टक्के पाणीसाठा आहे. तामिळनाडू आणि कर्नाटकात अनुक्रमे ९२ टक्के आणि ८८.५ टक्के पाणीसाठा आहे. तर केरळमध्ये ७५.५ टक्के पाणीसाठा आहे..उत्तर भारतातील ११ धरणांतील १९.८३६ अब्ज घनमीटर क्षमतेच्या १७.२३५ अब्ज घनमीटर म्हणजेच ८७ टक्के पाणीसाठा झाला आहे. राजस्थानमध्ये हे प्रमाण ९५ टक्के, हिमाचल प्रदेशात ८४ टक्के आणि पंजाबमध्ये ८३.५ टक्के एवढे आहे. .पूर्वेकडील २७ धरणांतील २१.७५९ अब्ज घनमीटर क्षमतेच्या १७.६६४ अब्ज घनमीटर म्हणजेच ८१ टक्के पाणीसाठा आहे. मिझोरम आणि त्रिपुरा व्यतिरिक्त, ओडिशात ८५ टक्के पाणीसाठा आहे. पश्चिम बंगालमधील पाणीसाठा या आठवड्यात ४५ टक्क्यांच्या खाली आला. मेघालयातील एकमेव धरण पूर्णपणे भरले आहे. तर बिहारमध्ये ६१ टक्के पाणीसाठा आहे..देशातील एकूणच पाणीसाठा पाहता तो रब्बी पिकांसाठी फायद्याचा ठरणार असल्याचे मानले जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून माघारी परतला आहे. तर ईशान्य मोसमी पाऊस दक्षिण द्वीपकल्पात दाखल झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.