शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव आले समोर २०२३ वर्षात दर तासाला किमान एका शेतकऱ्याने जीवन संपवलेशेतकरी आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात.Farmers Death: शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर आले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या अहवालातून असे दिसून आले आहे की, २०२३ वर्षात दर तासाला किमान एका शेतकऱ्याने जीवन संपवले. यावरुन शेतकरी किती आर्थिक संकटातून जात आहे, हे दिसते. सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दिसून आले आहे. .शेतकरी आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे. आत्महत्या करणाऱ्यांपैकी बहुतांश महाराष्ट्रातील (३८.५ टक्के) आहेत. त्यानंतर कर्नाटक (२२.५ टक्के), आंध्र प्रदेश (८.६ टक्के), मध्य प्रदेश (७.२ टक्के) आणि तामिळनाडू (५.९ टक्के) या राज्यांतील शेतकरी आहेत. .Farmer Death: पीकनुकसानीमुळे व्यथित शेतकऱ्याची आत्महत्या.२०२३ मध्ये, शेतीत काबाडकष्ट करणाऱ्या एकूण १०,७८६ व्यक्तींनी जीवन संपवले. हे प्रमाण देशातील एकूण आत्महत्याग्रस्तांपैकी ६.३ टक्के एवढे होते. कृषी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या एकूण आत्महत्यांपैकी ४३ टक्के शेतकरी, तर उर्वरित शेतमजूर होते. एकूण ४,६९० शेतकरी आणि ६,०९६ शेतमजूरांनी जीवन संपवले. शेतकरी आत्महत्यांमध्ये ४,५५३ पुरुष आणि १३७ महिलांचा समावेश होता, असे आकडेवारीवरुन दिसून आले आहे..'या' राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण शुन्यतर, काही प्रमुख राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्येचे प्रमाण शून्य आहे. यात पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे. .Farmer Issue: आत्महत्या, की व्यवस्थेचा बळी!.२०२२ मध्ये, उत्तराखंडमध्ये आत्महत्येचे प्रमाण शुन्य होते. पण २०२३ मध्ये, तिथे आत्महत्येची नोंद झाली. यावर्षी झारखंड, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एकाही आत्महत्येची नोंद झाली नाही. पण मागील वर्षी, नोंद झाल्याचे दिसून आले. .२०२२ वर्षात शेतीशी संबंधित क्षेत्रात आत्महत्यांचे प्रमाण तुलनेने अधिक राहिले. २०२२ मध्ये शेती क्षेत्रातील एकूण ११,२९० व्यक्तींनी जीवन संपवले. त्यात ५,२०७ शेतकरी आणि ६,०८३ शेतमजुरांचा समावेश होता. .दरम्यान, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२३ वर्षात देशात एकूण १,७१,४१८ आत्महत्यांची नोंद झाली. हे प्रमाण २०२२ च्या तुलनेत ०.३ टक्के अधिक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.