Nagpur News: राज्यात ‘एक जिल्हा, एक खेळ, एक संघटना’ या तत्त्वावर संघटनांना मान्यता देण्यात येणार आहे. राज्य शासनातर्फे नवे क्रीडा धोरण आखण्यात येत असून याचा समावेश या धोरणात असणार असल्याची माहिती क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली..डॉ. मनीषा कायंदे यांनी लक्ष्यवेधीच्या माध्यमातून विदर्भ हॉकी असोसिएशनचा प्रश्न मांडला. राज्यामधील ही १९६० पासूनची मान्यताप्राप्त हॉकी संघटना होती. या संघटनेशी विदर्भासह मराठवाडा, खानदेशातील २२ जिल्हे संलग्नित आहेत. मात्र, हॉकी इंडियाने विदर्भातील या संघटनेला मान्यता देण्याऐवजी हॉकी महाराष्ट्र या संघटनेला मान्यता दिली, असे नमूद करीत कायंदे यांनी संघटनांच्या वादाकडे लक्ष वेधले..FPC Policy: ‘एफपीसीं’साठी स्वतंत्र धोरण आणणार.विदर्भ हॉकी संघटनेच्या मान्यतेच्या मुद्यावर माहिती देताना मंत्री कोकाटे म्हणाले, की हॉकी महाराष्ट्राला हॉकी इंडियाने मान्यता दिली आहे. हॉकी इंडिया ही भारतीय ऑलिंपिक महासंघाशी संलग्नित आहे. या निर्णयाच्या विरोधात विदर्भ हॉकी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती..Sports Legacy: येथे घडतात कबड्डीपटू....मात्र, तिथूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. दरम्यान, हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या घटनेसंबंधी कायंदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची तपासणी करण्यात येईल. यासंदर्भात धर्मदाय आयुक्तांकडून आवश्यक माहिती मागवण्यात येईल. यात काही गैर आढळल्यास त्यासंबंधीचा निर्णय घेण्यात येईल.या वेळी प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले..संघटनेच्या कार्यांविषयी नियमावलीक्रीडा संघटनातील वादावर बोलताना श्री. कोकाटे यांनी केंद्र पातळीवर लवकरच क्रीडा विषयक कायदा होणार आहे. भारतीय ऑलिंपिक महासंघाने ‘एक खेळ, एक राज्य, एक संघटना’ असा नियम आहे. त्याच धर्तीवर राज्यपातळीवर एक जिल्हा, एक खेळ, एक संघटना असे तत्त्व राबवण्यात येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.