Chhatrapati Sambhajinagar News : राज्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधत एक कोटी महिलांना ‘लखपती’ बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी महिलांना रोजगार, उद्योजकता व आर्थिक सबलीकरणाच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले..फुलंब्री येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज राज्यस्तरीय अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी (ता. १७) पार पडले. या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, माजी खासदार रावसाहेब दानवे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार रमेश बोरणारे, आमदार प्रशांत बंब, आमदार संजना जाधव, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, सभापती डॉ. राधाकिसन पठाडे, पोपटराव पवार, डॉ. अविनाश पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती..CM Devendra Fadnavis: ‘एआय’मुळे शेतकऱ्यांना आभासी मदतनीस मिळाले.प्रास्ताविकात श्री. गोरे यांनी, जोपर्यंत हे अभियान सुरू आहे तोपर्यंत मी घरी जाणार नसल्याची ग्वाही नागरिकांना दिली. केंद्र व राज्य सरकारच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास ६५ टक्के लोकांचे प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले..Tribal Women Empowerment: आदिवासी महिला योजनेच्या माध्यमातून होणार सक्षम.श्री. फडणवीस म्हणाले, की मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात महिलांना आर्थिक उन्नतीच्या मार्गावर नेणे हा आमचा निर्धार आहे. राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींना रोल मॉडेल बनवून स्वच्छता, पाणीपुरवठा, डिजिटल सुविधा व आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने त्या कार्यरत राहतील,.सहकार क्षेत्राला बळकटी देणे हे देखील सरकारच्या अजेंड्यावर आहे. लाडक्या बहिणींसाठी गावातच पतसंस्था उभारण्याचा प्रयत्न सरकार करणार असून यामुळे बचत गट व लघुउद्योजकतेसाठी भांडवल मिळविणे सोपे होईल. तसेच शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून जलसंधारणाच्या कामावर अधिक भर देण्यात येईल. महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी धनादेश या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.