Sangli News: सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम ८० टक्के उरकला आहे. कोल्हापूर विभागात ३८ साखर कारखान्यांनी १ कोटी ७३ लाख ३९ हजार ९८३ टन उसाचे गाळप करत एक कोटी ८६ लाख ३१ हजार ९१९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखरेचा उतारा १०.७५ टक्के इतका आहे. कोल्हापूर जिल्हा गाळप, उत्पादन आणि उताऱ्यात आघाडीवर आहे..कोल्हापूर विभागात सांगली जिल्ह्यातील १० सहकारी, ५ खासगी व कोल्हापूर जिल्ह्यातील १२ सहकारी, ७ खासगी अशा एकूण ३८ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन सुमारे तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडून गाळप हंगाम जवळपास अंतिम टप्प्याकडे आला असल्याचे चित्र आहे..Sugar Production: साखर उत्पादन २२ टक्के वाढले, कारखाने आर्थिक दबावाखाली, विक्री दरावरून 'इस्मा'कडून चिंता व्यक्त .कोल्हापूर जिल्हातील २२ साखर कारखाने सर्वाधिक गाळपात आणि साखरेच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. तर साखरेचा उतारा १०.९९ टक्के आहे. सांगली जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी ६८ लाख ७ हजार २९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून साखरेचा उतारा १०.३५ टक्के आहे..गतवर्षी कोल्हापूर विभागात गाळप हंगाम सुमारे ११० दिवस चालला होता. यंदाच्या हंगामात कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने गाळप सुरू केले नाही. यंदाचा हंगाम १०५ ते ११० दिवस चालेल असेही साखर कारखान्यांनी सांगितले आहे..Sugar Production: राज्यातील साखर उत्पादन ५६.३० लाख टनांवर, उताऱ्यात कोल्हापूरची आघाडी कायम.सांगली जिल्ह्यात गतवर्षीच्या गाळप हंगामात ७७ लाख ६६ हजार ३५६ टन उसाचे गाळप करून ८१ लाख ४६ हजार ५४० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. यंदाच्या हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा फटका ऊस पिकाला बसला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात उत्पादन कमी होईल, असा अंदाज साखर कारखान्यांची व्यक्त केला आहे..सांगली जिल्ह्यातील गाळप दृष्टिक्षेपसहकारी, खासगी कारखाने ः १५गाळप ः ६५,७७,८५५ टनसाखर उत्पादन ः ६८,०७,०२९ क्विंटलउतारा ः १०.३५ टक्के.कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप दृष्टीक्षेपसहकारी, खाजगी कारखाने ः २२गाळप ः १,०७,६२,१२८ टनसाखर उत्पादन ः १,१८,२४,८९० क्विंटलउतारा ः १०.९९ टक्के.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.