Jalgaon Zilha Bank : जळगाव जिल्हा बँकेच्या पिलखोड शाखेत दीड कोटीचा गैरव्यवहार

Bank Update : विड्रॉल स्लिपांवरील सह्या खोट्या व बनावट असूनही त्या खऱ्या असल्याचे भासवत एकूण एक कोटी ५१ लाख ७५ हजार ४८२ रुपये रकमेचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार जिल्हा बँकेच्या पिलखोड (ता. चाळीसगाव) शाखेत उघडकीस आला आहे.
Jalgaon Zilha Bank
Jalgaon Zilha BankAgrowon
Published on
Updated on

Jalgaon Bank News : विड्रॉल स्लिपांवरील सह्या खोट्या व बनावट असूनही त्या खऱ्या असल्याचे भासवत एकूण एक कोटी ५१ लाख ७५ हजार ४८२ रुपये रकमेचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार जिल्हा बँकेच्या पिलखोड (ता. चाळीसगाव) शाखेत उघडकीस आला आहे.

या प्रकरणी सात जणांविरोधात मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा बँकेच्या पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील शाखेत १ जुलै २०१९ ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत तत्कालीन शाखा व्यवस्थापक (हल्ली तात्पुरते निलंबित) विशाल देशमुख (रा. तामसवाडी) याने त्याला दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून रवींद्र पाटील, प्रवीण पाटील (रा. तामसवाडी, ता. चाळीसगाव), तसेच तत्कालीन आरएफओ फॉरेस्ट विभाग मालेगाव, सटाणा, दिंडोरी (जि. नाशिक), तत्कालीन आरएफओ सामाजिक वनीकरण विभाग (नाव माहीत नाही) असे सहा जण व इतरांनी कटकारस्थान व संगनमताने बँक शाखेत बनावट व खोट्या सह्या असलेल्या विड्रॉल स्लिपाद्वारे रकमा काढल्या. शाखा व्यवस्थापकांनी विड्रॉल स्लीपवरील सह्या या बनावट व खोट्या असल्याचे माहीत असूनही त्या खऱ्या आहेत, असे भासवले.

Jalgaon Zilha Bank
Solapur Zilha Bank : सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक का घेतली नाही? प्रतिज्ञापत्र सादर करा

जिल्हा बँकेचे विभागीय उपव्यस्थापक लक्ष्मण पाटील यांनी याबाबत मेहुणबारे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योजनांच्या यादीत ५०० लाभार्थी शेतकऱ्यांची नावे होती.

अशा प्रकारे आठ लाख १४ हजारांचा गैरव्यवहार केला, तर बँक खात्यातून विड्रॉल केलेल्या रकमांच्या विड्रॉल स्लिपा गहाळ करून २९ लाख ८९ हजार ३११ रुपयांचा गैरव्यवहार करून विशाल देशमुख याने स्वत:चा फायदा करून घेतला.

मालेगाव, सटाणा, दिंडोरी येथील वन विभागामार्फत काही खातेदारांच्या खात्यांमध्ये नियमित स्वरूपात ‘एनईएफटी’ येत असल्याचे दिसून आले. त्यात ६२ खातेदारांच्या खात्यात ऑनलाइन रकमा जमा झाल्या.

विशेष म्हणजे, मालेगाव, सटाणा, दिंडोरी येथील वन विभागात कोणत्याही प्रकारची कामे केलेली नाहीत किंवा वन विभागाकडे बँकेचे काहीएक देणे घेणे नसताना रवींद्र पाटील व प्रवीण पाटील यांनी वन विभाग मालेगाव, सटाणा व दिंडोरी तसेच सामाजिक वनीकरण येथील आरएफओ यांच्याशी संगनमत करून खातेदारांना न कळवता परस्पर, तसेच लोकांचे बँक पासबुक घेऊन बँकेतील विड्रॉल स्लिपांवर बोगस व बनावट सह्या केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com