Jalgaon Agriculture : जळगाव जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल, धरणगाव भागात भेंडीचे क्षेत्र कमी झाले आहे. कमी पाऊस व उष्णतेमुळे अनेकांनी लागवड टाळली आहे. .एरंडोलमधील खर्ची, खेडी, कढोली, धारागीर, एरंडोल, कासोदा, जवखेडा, उत्राण, तळई आदी भागात भेंडी पीक असते. तसेच धरणगावमधील पथराड, चोरगाव, चांदसर, दोनगाव, पाळधी, रेल, लाडली, भोकणी, फुलपाट, आव्हाणी व इतर भागात भेंडी पीक बारमाही घेतले जाते. .Kharif Sowing: गतवर्षी जादा पाऊस, यंदा कमालीची ओढ.पावसाळ्यात या भागात भेंडी असते. तसेच अनेक जण जूनमध्ये लागवड करतात. परंतु उन्हाळ लागवड बरी होती. पण खरिपातील लागवड घटली आहे..Rain Deficit in Vidarbh: अकोला, बुलडाणा, वाशीममध्ये पावसाची तूट.कमी पाऊस असल्याने जुलैमधील भेंडीची लागवड कमी झाली आहे. ज्या भागात लागवड झाली आहे, त्यातून पुढील महिन्यात किंवा ३० ते २३ दिवसानंतर भेंडीची काढणी सुरू होईल. .गिरणा पट्ट्यात अनेक शेतकरी पावसाच्या अपेक्षेने भेंडी लागवड करतात. भेंडीस चांगला पाऊस असल्यास अनुकूल स्थिती असते. पण यंदा पाऊसमान कमी आहे. जुलैच्या अखेरिस ऊन तापू लागले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.