Jalgaon News: खानदेशात तेलबियांची पेरणी सुरू झाली आहे. सूर्यफूल पेरणी सुरू असून, भुईमूग पेरणी सातपुडालगत बऱ्यापैकी होईल, असे दिसत आहे. खानदेशात भुईमुगाची पेरणी किंवा लागवड डिसेंबरमध्ये सुरू होते. यंदा क्षेत्रात किंचीत वाढ होईल किंवा क्षेत्र स्थिर राहील, असे चित्र आहे. सूर्यफूल पेरणी या आठवड्यातही सुरू आहे. .आगाप भुईमुगाची पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस अनेकांनी केली. डिसेंबरमध्ये तिसऱ्या आठवड्यात भुईमूग पेरणीला वेग येऊ शकतो. मागील वेळेसही डिसेंबरमध्ये भुईमूग पेरणी गतीने सुरू झाली होती. अनेकांनी पेरणी नोव्हेंबरअखेरीस तुषार सिंचनाच्या मदतीने करण्याचे नियोजन केले होते..Oilseed Sowing: तेलबिया पेरणी स्थिर; सूर्यफूल पेरा रखडला.पेरणीला गतीसर्वाधिक पेरणी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. खानदेशात भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते. शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देतील, असेही संकेत आहेत. मागील हंगामात खानदेशात सुमारे 900 हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली होती. .यंदा ही पेरणी सुमारे 1000 ते 1100 हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत. मागील वेळेस पाऊसमान चांगले होते. जळगाव जिल्ह्यातील पश्चिम भागात गिरणा धरणातून रब्बीसाठी आवर्तन मिळणार आहे. रब्बी हंगाम जोमात येईल, अशी अपेक्षा आहे. यंदाही पाऊस चांगला आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे 20 टक्के अधिक पाऊस झाला. धुळ्यात 20 टक्के व.Pulses,Oilseeds Procurement: उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कडधान्य व तेलबिया पिकांच्या हमीभाव खरेदीला परवानगी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती.नंदुरबारातही सुमारे 20 टक्के अधिक पाऊस झाला आहे. मागील वेळेसही चांगला पाऊस झाला होता. यंदा कमाल सिंचन प्रकल्प 100 टक्के भरले. प्रमुख सिंचन प्रकल्पांतूनही रब्बीला पाणी मिळणार आहे. जळगावातील गिरणा, मन्याड, बहुळा, भोकरबारी, अग्नावती, धुळ्यातील अमरावती, अनेर, पांढरा, बुराई आदी प्रकल्पांतून पाणी मिळेल. सूर्यफूलासह भुईमुगाची पेरणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, भडगाव, एरंडोल, धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारातील शहादा, नवापूर, नंदुरबार भागातही होईल. कारण पाऊसमान चांगले आहे..भुईमूग पेरणी सातपुड्यालगतखानदेशात जळगावातील गिरणा पट्टा, धुळ्यातील धुळे, साक्री आदी भागांत भुईमुगाची पेरणी सुरू आहे. सातपुड्यालगत जळगावातील यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा भागात पेरणी स्थिर असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सर्वाधिक पेरणी होईल, अशी माहिती आहे. अनेक जण पेरणीसाठी तुषार व ठिबक सिंचन तंत्र वापरत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.