Pune News: करडई, जवस, तीळ आणि सूर्यफूल या तेलबिया पिकांकडे शेतकऱ्यांचा कल हळूहळू वाढताना दिसत आहे. यंदा रब्बी हंगामात पुणे विभागात तेलबिया पिकांची ४३०४ हेक्टरवर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..गतवर्षी या पिकांचे सरासरी ४२५१ हेक्टर होते. मात्र प्रत्यक्षात २८०१ हेक्टरवरच पेरणी झाली होती. यंदा रब्बी तेलबियांचे क्षेत्र सरासरी २६९२ हेक्टर क्षेत्र आहे. मागील पाच वर्षांमध्ये झालेली पीक लागवड गृहीत धरून यंदाची सरासरी काढण्यात आली आहे. त्यानुसार सरासरी क्षेत्रात मोठी घट नोंदविण्यात आली आहे. तेलबिया पिकांखाली पिकांचे गतवर्षी ४२५१ हेक्टर क्षेत्र होते, त्यात बदल होऊन यंदा २६९२ हेक्टर झाले आहे..Oilseed Farming: खानदेशात तेलबिया पेरणी सुरू.सध्या बहुतांश ठिकाणी पिके वाढीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. काही भागांत पिके काढणीसाठी तयार होत आहेत. त्यामुळे पुढील महिन्यापासून तेलबिया पिकांची काढणी सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा थंडीचे प्रमाण अधिक असल्याने पिके जोमदार वाढली आहेत. तीन ते चार महिन्यांचा कालावधी असलेल्या गळीत धान्य पिकांची पेरणी अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात केली होती. त्याची काढणी आता सुरू होणार आहे..दरम्यान, काही भागांत मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असून, त्याचा उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पुणे व सोलापूर जिल्ह्यांत तेलबिया पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्याचा परिणाम म्हणून पुणे जिल्ह्यात तेलबिया पिकांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे..Pulses,Oilseeds Procurement: उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कडधान्य व तेलबिया पिकांच्या हमीभाव खरेदीला परवानगी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती.अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर, पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर आणि राहाता या तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक पेरणी नोंदविण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात तेलबिया पिकांची सर्वाधिक पेरणी झाली असून, सरासरी २४६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे..हवेली, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि शिरूर तालुक्यांत मात्र तुरळक पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुका आघाडीवर असून, सरासरी ८३१ हेक्टरच्या तुलनेत तब्बल १९८५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. माढा तालुक्यात सरासरी ६५ हेक्टरच्या तुलनेत ६०३ हेक्टरवर, तर अक्कलकोट तालुक्यात सरासरी २६२ हेक्टरच्या तुलनेत ४४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, माळशिरस तालुक्यांतही कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाल्याचे चित्र आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.