Sangali News: ‘‘शाश्वत ग्रामविकासासाठी यंत्रणांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान समन्वयाने यशस्वी करावे. त्यातून शाश्वत स्वरूपात ग्रामविकासाची कामे पूर्ण करावीत,’’ अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या..जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. ३) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची आढावा बैठक झाली त्या वेळी श्री. काकडे बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, तहसीलदार लीना खरात, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक टी. एन. खांडेकर, सहायक आयुक्त, कौशल्य विकास इनुजा शेख उपस्थित होते..Samruddha Panchayat Raj : ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये अकोल्याने लौकिक वाढवावा.श्री. काकडे म्हणाले, ‘‘केंद्राच्या पंचायतराज विभागाने शाश्वत विकासाच्या ध्येयांच्या स्थानिकीकरणाच्या अनुषंगाने शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे अपेक्षित आहे..विकासाच्या बहुतांश योजना पंचायतराज विभागामार्फत राबवल्या जातात. त्यामुळे या योजनांची प्रभावी व गतीने अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी कार्यवाही करावी. शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावा व त्यांचे जीवनमान उंचवावे.’’.Mukhyamantri Samruddha Panchayat Raj Abhiyan: समृद्ध पंचायतराज अभियानात २४४ गावांचा सहभाग.श्री. नरवाडे म्हणाले, ‘‘दिव्यांग यूडीआयडी वाटप, नळपाणी पुरवठा जोडणी, संजय गांधी निराधार योजना, विद्यार्थ्यांना जातीचे दाखले आदी अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी तालुका स्तरावर बैठक घेऊन परस्पर समन्वय ठेवावा..अधिकाधिक पात्र लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यरत राहावे. या अभियानात सांगली जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय व्हावी, यासाठी जिल्हा परिषद व अन्य शासकीय यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.’’.दिव्यांगांना यूडीआयडी वाटप, पीएम सूर्यघर, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून पात्र बेरोजगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण व कर्जवाटप, संजय गांधी निराधार योजनेतून पात्र लाभार्थींची यादी मंजुरी, ॲग्रीस्टॅक योजना, शेतकरी उत्पादक गट संस्था, बचत गटांना प्रशिक्षणाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.