Bhuvneshwar News: दुष्काळ निवारण कार्यक्रम राबविण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी १४१.५० कोटी रुपये खर्चाचा नुकताच सामंजस्य करार केला आहे. हवामान अनुकूल शेतीसाठी हा कार्यक्रम राबविला जात असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे..बारामुंडा येथे आयोजित ‘कृषी ओडिशा २०२६’ प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी गुरुवारी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. राज्याच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प तात्पुरत्या स्वरूपाच्या मदतीपुरता मर्यादित नसेल..Drought Mitigation Programme: ओडिशाचा दुष्काळ निवारण कार्यक्रम, हवामान अनुकूल शेतीसाठी १४१ कोटींचा करार.याद्वारे शेतीपासून संपूर्ण मूल्यसाखळीपर्यंत वैज्ञानिकदृष्ट्या चालणारी एक मजबूत व्यवस्था उभारली जात आहे. राष्ट्रीय दुष्काळ निवारण प्रकल्प (एनडीएमपी) अंतर्गत केलेल्या या करारामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तसेच ‘आयसीआरआयएसएटी’, ‘आयआरआरआय’ आणि ‘आयसीएआयआर- सीआरआयडीए’ यांसारख्या संशोधन संस्था एकत्र आल्या आहेत..MoU For Smart Farming: महात्मा फुले कृषी विद्यापीठ,बायफ संस्थेत संशोधनासाठी करार.दुष्काळ निवारण कार्यक्रमाच्या माध्यमातून दुष्काळ प्रतिरोधक बियाण्यांच्या वाणांचा वापर, पाणी पुनर्भरण संरचनांना प्रोत्साहन आणि चोख मृदा व्यवस्थापन या गोष्टी साध्य होणार असून, याचा सुमारे २४ हजार कुटुंबांना थेट लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे..या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंह देव म्हणाले, की शेतीत नावीन्यपूर्णता आणणे, शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे आणि शाश्वत शेतीच्या माध्यमातून राज्याच्या शेती क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ‘कृषी ओडिशा’ हे शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, संस्था आणि बाजारपेठेतील लोकांशी जोडणारे एक व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले आहे. त्या माध्यमातूनच राज्याचे शेतीक्षेत्र आमूलाग्र बदलणारा हा करार करण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.