Akola News: महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी गुरुवारी (ता. २२) आरक्षण जाहीर झाले असून हे पद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव निघाले आहे. या निर्णयामुळे सर्वाधिक सदस्य निवडून आलेल्या व सत्तेचा दावेदार असलेल्या भाजपमध्ये महापौर पदासाठी अंतर्गत चुरस वाढली आहे..गेल्या आठवड्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने एकूण ३८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली आहे. मात्र बहुमतासाठी ४१ सदस्यांची गरज असल्याने पक्षाने सत्ता स्थापनेसाठी इतर बैठकांद्वारे समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे. याचवेळी महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने ओबीसी प्रवर्गातील महिलांना संधी मिळाली आहे..Maharashtra Municipal Mayor Reservation: मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडचा महापौर खुल्या प्रवर्गाचा, आरक्षण सोडत जाहीर.भाजपकडून या प्रवर्गातून सहा निवडून आलेल्या आहेत. त्यापैकी काही जणी महापौर पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. यामध्ये मंजूषा शेळके, नीतू जगताप, योगिता पावसाळे, कल्पना गोटफोडे, प्राची काकड आणि शिल्पाताई वरोकार यांचा समावेश आहे..Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यात भाजपची जोरदार मुसंडी, जाणून घ्या महापालिकानिहाय निकाल.एकूण भाजपच्या विजयी सदस्यांमध्ये ओबीसी प्रवर्गातील महिलांची संख्या १३ आहे. त्यात वैशालीताई शेळके, पल्लवी मोरे, रश्मीताई अवचार, निकिताताई देशमुख, शारदाताई खेडकर, माधुरीताई क्षिरसागर, सोनाली अंधारे आणि अॅड. कल्पना गोटफोडे यांचा समावेश होतो. .महापौर पदासाठी अंतिम निर्णय घेण्यासाठी पक्ष नेतृत्व निर्णय घेणार आहे. वरिष्ठता, पक्षनिष्ठा, सामाजिक समीकरण लक्षात घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाईल, हे निश्चित आहे. त्यामुळे शहरवासीयांचे लक्ष आता महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. महापौर पदासाठी योग्य उमेदवार निवडल्यास भाजप सत्ता अधिक मजबूत करू शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.