Crop loan NPA Account Benefits: राज्यात सहकारी बँकांपेक्षा व्यापारी बँकांकडून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ‘एनपीए’तील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी संबंधित बँकांचीच असून, त्यासाठी शासनाने ठरविलेल्या सवलत सूत्राची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे सहकार विभागातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले..पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत राष्ट्रीयीकृत बँकांमधील शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी राज्य सरकारने बँकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. अनुत्पादक (एनपीए) खात्यांमधील खातेबाकीवर (लेजर बॅलन्स) बँकांनी सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही सवलत संबंधित खातेदाराला मिळवून देण्याची जबाबदारी बँकेची आहे. सवलत देताना आखडता हात घेतला किंवा तांत्रिक त्रुटी राहिल्यास शेतकऱ्यांसमोर विनाकारण अडचणी निर्माण होतील, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे..Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२.केवळ ‘त्या’ रकमेची जबाबदारी शेतकऱ्याकडेमात्र शेतकऱ्याच्या अनुत्पादक (एनपीए) खात्यातील थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास अतिरिक्त रक्कम संबंधित शेतकऱ्याने भरावी लागेल. कारण, ती रक्कम भरल्यानंतरच सवलतीच्या सूत्रानुसार बँक तडजोड करेल आणि त्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांची कर्जमाफी संबंधित खात्यात जमा होईल, असे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले..उदाहरणार्थ, एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेतील एनपीए खाते चार लाख रुपयांचे असून एनपीएची तारीख ३१ मार्च २०२३ असेल, तर बँक ५५ टक्के सवलत देईल. त्यानंतर थकबाकी २.२० लाख रुपये राहील. त्यातील अतिरिक्त २० हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्याने भरल्यानंतर उर्वरित दोन लाख रुपयांची कर्जमाफी राज्य शासनाशी संबंधित खात्यात जमा करेल. म्हणजेच चार लाख रुपयांच्या या एनपीए खात्यातील उर्वरित १.८० लाख रुपये बँकेने सवलत म्हणून सोडून द्यायचे आहेत. त्याचबरोबर संबंधित एनपीए खाते बंद करून त्या शेतकऱ्याला तातडीने नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यायचे आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले..सवलतीचे सूत्र बँकांनी पाळायला हवेमुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात बँकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली होती. या बैठकीत एनपीएतील खातेदार शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकेने तडजोड कशी करावी, याचे सवलत सूत्र निश्चित करण्यात आले. हे सूत्र सर्व बँकांनी पाळणे अपेक्षित असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील एनपीए खात्यातील थकबाकी १.९० लाख रुपये असून, एनपीएची तारीख ३१ मार्च २०२३ असेल, तर सवलत सूत्रानुसार बँक ५५ टक्के सवलत देईल. .त्यामुळे पात्र रक्कम १,०४,५०० रुपये राहील. ही रक्कम राज्य शासनाशी संबंधित बँकेच्या खात्यात थेट जमा करेल. उर्वरित ८४,५०० रुपये बँकेने सवलत (सॅक्रिफाइस) म्हणून सोडून देत संबंधित शेतकऱ्याचे एनपीए खाते बंद करायचे आहे. त्यानंतर शेतकऱ्याला नवीन पीककर्जही द्यायचे आहे. हा निर्णय मंत्रालयात बँकांसोबत झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले..Farm Loan Waiver: अकोल्यातील ८२,९२२ शेतकरी कर्जमाफीसाठी संभाव्य पात्र.थकीत वसुलीवर डोळा; सहकार्याच्या नावाने नकारघंटाराज्य सरकारच्या कर्जमुक्ती योजनेमुळे राज्यातील सहकारी आणि व्यापारी अशा सर्व बँकांची अनुत्पादक खाती नियमित होणार असून, बँकांना मोठ्या प्रमाणात थकीत कर्जाची वसुली होणार आहे. अशा वेळी दारात आलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका बँकांनी घ्यायला हवी. अॅग्रीस्टॅक, आधार प्रमाणीकरणाबाबत संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, कर्जमाफी योजनेतील सवलतीचे सूत्र समजावून सांगणे आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. मात्र, व्यापारी बँकांनी केवळ सरकारी यंत्रणा आणि सहकार विभागाकडे बोट दाखवत हजारो कोटींच्या थकीत वसुलीवरच लक्ष केंद्रित केल्याची नाराजी सहकार विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.....असे आहे बँकांवर बंधनकारक तडजोड सवलतीचे सूत्रअनुत्पादक कर्ज खात्याची (एनपीए) तारीख...एनपीए खात्याचा तडजोड दर (सेटल्ड अमाउंट)३० सप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी एनपीए तारखेच्या खातेबाकीच्या ३५ टक्के१ ऑक्टोबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२ एनपीए तारखेच्या खातेबाकीच्या ४५ टक्के१ ऑक्टोबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ एनपीए तारखेच्या खातेबाकीच्या ५५ टक्के१ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ एनपीए तारखेच्या खातेबाकीच्या ७० टक्के१ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ एनपीए तारखेच्या खातेबाकीच्या ८५ टक्के.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.