Pune News: शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी आता विद्यार्थी आणि पालकांना तहसील कचेरी किंवा सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत, पुणे जिल्हा प्रशासनाने शाळेतच दाखले वितरण हा पायलट प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे प्रशासकीय सेवा थेट विद्यार्थ्यांच्या दारी पोहोचणार आहे..इयत्ता १० वी आणि १२ वीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेसाठी उत्पन्न, जात, राष्ट्रीयत्व, अधिवास (डोमिसाइल) आणि नॉन-क्रिमी लेयर यांसारख्या प्रमाणपत्रांची गरज असते..Government Remuneration: हक्काचा शासकीय मोबदला वर्षानुवर्षे मिळेना .अनेकदा कागदपत्रांच्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांची धावपळ होते. ही समस्या ओळखून जिल्हा प्रशासनाने शाळा स्तरावरच अर्ज भरून घेणे आणि तिथेच दाखल्यांचे वाटप करणे, अशी नवी व्यवस्था कार्यान्वित केली आहे..Fake Documents Report: शिर्केंच्या वादग्रस्त कागदपत्राचा चौकशी अहवाल अखेर सादर.या प्रकल्पाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि वेल्हे या दोन तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत सेतू सुविधा केंद्रे, आपले सरकार सेवा केंद्रे, शाळा प्रशासन, तहसील कार्यालय आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यात समन्वय साधला जात आहे. वेल्हे (राजगड) तालुक्यात तहसीलदार निवास ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे (राजगड) तालुक्यातील सेतू चालक आणि महा-ई-सेवा केंद्र चालक काम करणार आहेत..प्रकल्पाची वैशिष्ट्येथेट मार्गदर्शन : विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज पद्धती आणि आवश्यक कागदपत्रांबाबत शाळेतच मार्गदर्शन मिळेल.त्रुटीमुक्त अर्ज : तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे अर्जातील चुका कमी होऊन दाखले लवकर मिळतील.लोकाभिमुख प्रशासन : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, मुख्यमंत्री फेलोशिपअंतर्गत नियुक्त ओंकार मुत्तेवार या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.