Indian Agri Cooperatives: देशात २५ टक्केही शेतकरी सहकाराशी जोडलेले नाहीत
FEED Report: भारतातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ६० ते ७० टक्के शेतकरी कुटुंबे असतानाही २५ टक्क्यांहून कमी शेतकरी हे कृषी सहकारी संस्थांशी सक्रिय सदस्य म्हणून जोडलेले आहेत, अशी माहिती फोरम ऑफ एंटरप्रायझेस फॉर इक्विटेबल डेव्हलपमेंट (फीड) यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे.