New Delhi News : भारतातील वायव्येकडील राज्यांत यंदाच्या मॉन्सूनमध्ये आॅगस्ट महिन्यात सरासरी २६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद २००१ पासूनच्या आॅगस्ट महिन्यातील पावसाच्या नोंदींमधील सर्वाधिक असून, १९०१ पासून करण्यात आलेल्या नोंदींपैकी १३ वी सर्वाधिक पावसाची नोंद असल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले. .या राज्यांत मागील तीन महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जूनमध्ये १११ मिलिमीटर (सरासरीपेक्षा ४२ टक्के अधिक), जुलैमध्ये २३७.४ मिलिमीटर (सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक) आणि ऑगस्टमध्ये २६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. (सरासरीपेक्षा ३४.५ टक्के अधिक), अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. .Pune Rainfall: इंदापुरात मुबलक, बारामतीत कमी हजेरी .अपेक्षेपेक्षा जास्त झालेला हा पाऊस हवामान बदलामुळे झाला. देशभरात ऑगस्टमध्ये एकूण २६८.१ मि.मी. पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा सुमारे ५ टक्के जास्त आहे. जून ते ऑगस्ट मध्ये एकूण ७४३.१ मि.मी. पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा सुमारे ६ टक्के अधिक आहे..रखडलेला निधी द्या ः मानचंडीगड ः मुसळधार पावसामुळे पंजाबमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत, केंद्राने रखडविलेले सुमारे ६० हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राने तातडीने द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीबाबतच्या तरतुदींमध्ये सुधारणा करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांपर्यंत नुकसानभरपाई देण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे..Heavy Rainfall: हिंगोली, नांदेडला सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी.बियासी, रावी नदीला पूरपंजाबमधील अनेक ठिकाणी रविवारी जोरदार पाऊस झाला. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील जलसंधारण क्षेत्रांत मुसळधार पाऊस झाल्यामुळे सतलज, बियास आणि रावी या नद्या तसेच अनेक नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हवामान खात्याने रविवारी आणि सोमवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून मंगळवारपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे..रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत अमृतसरला ६०.९ मि.मी., लुधियानाला ३०.४ मि.मी.पाऊस झाला आहे. रविवारी चंदीगडमध्येही रविवारी जोरदार पाऊस झाला.या राज्यांना सर्वाधिक फटकापंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.