Financial Crisis Management: ‘मंदीच्या काळामध्ये नोकऱ्यांची संख्या का घटते?’ या प्रश्नाची उकल करणाऱ्या आर्थिक प्रारूपाच्या निर्मितीसाठी यंदाचा नोबेल सन्मान जाहीर झाला आहे. आर्थिक संकट आणि धक्क्यांच्या काळामध्ये विविध देशांची सरकारे आणि केंद्रीय बँकांना या प्रारूपाची मदत झाल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे. .अमेरिकी वंशाचे अर्थतज्ज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वूडफोर्ड या दोघांना यंदाचा हा सन्मान विभागून देण्यात येईल. रॉयल स्वीडिश अकादमीकडून आज ही घोषणा करण्यात आली. समग्रलक्ष्यी आर्थिक स्थैर्यासाठी सुक्ष्मलक्ष्यी आर्थिक आधाराची निर्मिती केल्याप्रकरणी त्यांचा सन्मान करण्यात आला..Global Economy: जागतिक विकासदर घटण्याचा अंदाज.‘समुद्राला ज्या प्रमाणे भरती आणि ओहोटी येते, अगदी तशीच काहीशी स्थिती अर्थव्यवस्थेमध्येही निर्माण होत असते. त्यातून अर्थव्यवस्थेला सुरक्षितपणे कसे बाहेर काढायचे, हे सांगणारे आर्थिक मॉडेल या दोन तज्ज्ञांनी तयार केले,’ असे अकादमीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे..रक्कम विभागून देणारया दोन्ही विजेत्यांना १.२ कोटी स्वीडिश क्रोनर अर्थात ११.५ कोटी रुपयांची रक्कम विभागून देण्यात येईल. मंदी आणि महागाईच्या काळामध्ये जगभरातील देशांसमोर मोठी आर्थिक आव्हाने निर्माण होत असतात. अशा स्थितीमध्ये ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उत्तम रणनीती आखण्यासाठी या मॉडेलची मदत होते, असे समितीने म्हटले आहे..Economy Conference: बांबू, इथेनाॅल, कार्बन हरित अर्थव्यवस्थेवर २७ पासून परिषद; पाशा पटेल यांची पत्रकार परिषदेत माहिती .निर्णयांचा प्रभावलोकांकडून होणारा खर्च आणि विविध कंपन्यांचे आर्थिक निर्णय यांचा कशापद्धतीने प्रभाव पडतो, हे या संशोधनातून स्पष्ट झाले. यामुळे विविध सरकारे आणि केंद्रीय बँकांना संभाव्य धक्के पचविण्यासाठी क्षमता मिळते आणि कोणते निर्णय घ्यायला हवेत, हेदेखील त्यांना कळते..... तेव्हा मागणी घटतेलोक जेव्हा अचानक खर्च कमी करतात तेव्हा बाजारातील वस्तू अन् सेवांची मागणी घटू लागते. अशा स्थितीमध्ये कंपन्यांनादेखील त्यांचा उत्पादन खर्च कमी करावा लागतो. यामुळे नव्या भरतीला ब्रेक लागतो तसेच काही कर्मचाऱ्यांना नोकरीही गमवावी लागू शकते. अर्थतज्ज्ञ जॉन केन्स यांनी शंभर वर्षांपूर्वीच अर्थव्यवस्थेतील मागणी कमी झाल्यानंतर सरकार खर्च वाढवून परिस्थिती सुधारण्यास मदत करू शकते, असे म्हटले होते. यामुळे उद्योगांना आधार मिळतो आणि रोजगाराच्या संधीदेखील वाढतात. अनेक कुटुंब हे त्यांचे उत्पन्न आणि भविष्यातील आशेच्या आधारावर कशा पद्धतीने खर्च निश्चित करतात, हे हॉल यांच्या संशोधनातून उघड झाले..अर्थकारणाला स्थैर्य देणारा एक भक्कम असा सैद्धान्तिक पाया या दोन तज्ज्ञांनी घालून दिला असून, आज जगभरातील केंद्रीय बँका आणि सरकारे त्याच मॉडेलचा आधार घेऊन वाटचाल करत आहेत. या दोघांच्या कामामुळे आर्थिक झटक्यांच्या काळात अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने सावरायचे याची साधने उपलब्ध झाली आहेत. ऊर्जा संकट आणि लोकांच्या दरडोई क्रयशक्तीमध्ये अचानक बदल झाल्यानंतरची स्थिती कशारीतीने हाताळायची, याचेदेखील यामुळे आकलन झाले. जॉन हॅसलर, अध्यक्ष, आर्थिक विज्ञानविषयक समिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.