Monsoon Failure : माळीनगर पावसाने पाठ फिरवल्याने माळीनगर परिसरातील शेती पाण्याअभावी संकटात सापडली असून, पिके करपू लागली आहेत. माळीनगर, सवतगव्हाण, बिजवडी, गट क्रमांक २, तांबवे, गणेशगाव व महाळुंग या नीरा कालव्याच्या सिंचन क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कालव्यात तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे..पालखी सोहळ्याच्या काळात सुमारे दीड महिन्यापूर्वी कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर पाऊस झालेला नसल्याने शेतीची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. काही शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवेल आटल्या असून, काही ठिकाणी अत्यल्प पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे पिके वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे..Urad Crop Loss : पानगाव परिसरातील उडीद पिकावर फिरवला रोटावेटर.कालव्याच्या पाणी आवर्तनाबाबत शेतकऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी माळीनगर कारखाना व्यवस्थापनाकडे विचारणा केली होती. त्यावेळी पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही आवर्तनाबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ऑगस्ट महिना संपूनही मागील पाळीला दीड महिना होत आला आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन वेळेत करणे अपेक्षित होते, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे..Jalgaon Rainfall Deficit: जळगावात पावसाअभावी पिके कोमेजण्याच्या मार्गावर.कालव्याच्या पाण्याने सुटणार पिण्याच्या पाण्याचाही प्रश्नमहाळुंग नगरपंचायत हद्दीतील गट क्रमांक २ भागातील बहुतांश कुटुंबे पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलवर अवलंबून आहेत. बोअरवेल आटल्याने अनेक कुटुंबांना इतर ठिकाणांहून पाणी आणावे लागत आहे. कालव्यात पाणी सोडल्यास झिरपणामुळे बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. संभाजीनगर भागातही पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे..नगरपंचायतीच्या बोअरवेल व पाण्याच्या टाक्या दत्तनगर भागात असल्याने तेथून संभाजीनगरपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे नगरपंचायतीने या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.