Ahilyanagar News : खरिपातील मूग, उडीद आणि आता सोयाबीन, कापूस बाजारात आला. आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी मिळेल त्या दराने विक्री करतो, मात्र सरकारकडून अजून हमीकेंद्रे सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही. .हमीकेंद्रे नेमके कधी सुरू होणार,’ असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. हमी केंद्रे सुरू नसल्याने शेतीमालाची अत्यंत पडत्या दरात शेतकऱ्याकडून खरेदी सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा कापसाचे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर, सोयाबीनचे पावणे दोन लाख हेक्टरवर, मुगाचे साठ हजार, उडदाचे सत्तर हजार हेक्टरच्या जवळपास उत्पादन घेतले. .यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराने खरिपातील शेतीमालाची प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका सोयाबीन, कापसाला बसला आहे. त्यामुळे आधीच शेतकरी त्रस्त आहेत. आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी काढणी व सोंगणी केलेले सोयाबीन, तसेच वेचणी केलेला कापूस बाजारात विक्रीसाठी आणत आहे. .Soybean MSP Procurement: महाराष्ट्रात १८ लाख टन सोयाबीन खरेदीला मान्यता; मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना ८०० रुपये भावफरक.मूग, उडदाची आतापर्यंत बऱ्यापैकी विक्री झाली आहे. दर वर्षी साधारण सप्टेंबर-ऑक्टोबरच्या काळात शेतीमाल खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत हमी केंद्रे सुरू केली जातात. यंदा मात्र आक्टोबर सरत आली तरी हमीकेंद्रे सुरू करण्याच्या अजून तरी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत..हमीभाव केंद्र सुरू होण्यास कमालीचा विलंब झाल्याने शेतकऱ्यांना क्विंटलमागे दोन ते तीन हजार रुपयांचा फटका बसत असल्याचे दिसत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पणनचे कार्यालय आहे की नाही याबाबत शेतकऱ्यांनाच काय नेत्यांनाही माहिती नाही. सोयाबीन, कापूस, उडीद, मुगाची हमी दरापेक्षा कमी दराने विक्री करत आहेत. .त्यामुळे हमीकेंद्रे नेमके कधी सुरू होणार असा प्रश्न पडला आहे. उडदाला ७, ८०० रुपये क्विंटल हमीभाव असताना ३००० ते ४८०० रुपये तर सोयाबीनला ५,३२८ रुपये क्विंटल हमीभाव असताना बाजारभाव ३५०० ते ४००० रुपये क्विंटल मिळत आहे..Cotton MSP Procurement : पावसामुळे कापसाचा १२ टक्के ओलावा टिकवणे अवघड.लोकप्रतिनिधी, शेतकरी नेते गप्पअहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने आधीच शेतकऱ्यांच्या शेतीची, शेतमालाची वाताहात केलीय. मोठे नुकसान झाले. या नुकसानीतून वाचलेली पिके पदरात पाडून घेतले, आता आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी बाजारात विक्रीचा प्रयत्न सुरू आहे. .बाजारात कोणताच शेतीमाल हमी दराने खरेदी केला जात नाही. धान्यातील ओलावा व दर्जा नसल्याचे कारण पुढे करून दर कमी दिला जात आहे. दरवर्षी सुरू होणारी हमीकेंद्रे यंदा अजूनही सुरू नाहीत. तशा हालचालीही दिसेनात. लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही याबाबत गप्प आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.