Purandar News : वाल्हे तालुक्यातील पिंगोरी गावाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी लोकशाहीस नव्या उंचीवर उभे करणारा निर्णय घेतला आहे. निवडणूक म्हणजे पैशांचा व्यवहार नाही, तर गावाच्या भविष्यासाठी मतदान आहे, या भूमिकेतून ग्रामस्थांनी कोणत्याही उमेदवाराकडून पैसे, भेटवस्तू किंवा अन्य प्रलोभन न घेता मतदान करण्याचा ठाम संकल्प जाहीर केला आहे..स्वच्छ आणि प्रलोभनमुक्त मतदानाची ही संकल्पना महाराष्ट्र एज्युकेशनचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी मांडली. त्यांच्या या संकल्पनेला उपस्थित सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, माजी सैनिक, युवक व ग्रामस्थांनी एकमताने पाठिंबा दिला..Zilla Parishad Elections: मनधरणीसाठी सोमवार महत्त्वाच्या.यावेळी सरपंच संदीप यादव, मनोज शिंदे, लक्ष्मण कदम, राहुल शिंदे, रणजित शिंदे, रमेश शिंदे, अमोल शिंदे, भारतीय सैन्यदलातील मंगेश शिंदे, विशाल गायकवाड,दत्तात्रय शिंदे, धनंजय शिंदे, प्रकाश शिंदे, दिनेश भोसले, उद्योजक महादेव कदम, पोलिस पाटील राहुल शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..उमेदवारांनी गावात थेट येऊन प्रचार करावा, आपले काम व विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडावा. मात्र प्रचाराच्या नावाखाली पैसे वाटप, पार्ट्या, दारू, भेटवस्तू किंवा अन्य प्रलोभनांना गावात पूर्णपणे थारा दिला जाणार नाही, असे ठरवण्यात आले. पिंगोरी हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते..Local Body Elections: चाकूर तालुक्यात दोन अर्ज अवैध.‘तुम्ही सीमेवर लढा, आम्ही गावात लोकशाहीचे रक्षण करू,’ असा संदेश देत ग्रामस्थांनी लोकशाहीचा झेंडा गावात उंच फडकवण्याचा संकल्प केला. सैनिक सीमारेषेवर देशाचे रक्षण करत असताना गावकऱ्यांची जबाबदारी लोकशाही जपण्याची आहे, अशी भावना या निर्णयामागे आहे..लोकसहभागातून आम्ही गावामध्ये लाखो रुपये खर्च करून कामे उभी केली आहेत. अशा गावात हजार-पाचशे रुपयांसाठी मत विकणे आम्हाला मान्य नाही. आमचे मत आमच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. पिंगोरी हे सैनिकांचे गाव असल्याने देशासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या गावात लोकशाही मजबूत असली पाहिजे, असेही ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.