Solapur News : माणसं कशी पण जगतात हो, पण जनावरं कशी जगवायची? जनावरांचं पोट भरंल असा चाराच मिळत नाही. उपाशी जनावरांच हाल बगवत नाही. जीव नुस्ता तीळ तीळ तुटतोय ! (शिवणी, ता. उत्तर सोलापूर) येथील तरुण शेतकरी जीव तोडून सांगत होता. जनावरांना चारा द्या हो... चारा...! सीना नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात झाली. .तशी या नदीकाठच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जनावरांचे हाल होऊ लागले आहेत. सीना नदी काठच्या गावांत आता जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. सीना नदीच्या महापुराने आणि सततच्या अतिवृष्टीने उंबरगाव (ता. माढा)पासून ते शिवणी (ता. उत्तर सोलापूर) परिसरातील शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. शेतजमिनी वाहून गेल्या, घरात पाणी शिरले, संसार उद्ध्वस्त झाले. .पण यातूनही शेतकऱ्यांसमोर सर्वांत मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे जनावरांचा चारा. या विषयी गावातील नामदेव माळी या साध्या शेतकऱ्याची कहाणी अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी आहे. घरातील दोन-तीन जनावरे वाचविण्यासाठी ते रोज पाच-सहा किलोमीटर अंतर चालत जातात, गवत कापून डोक्यावर ओझे घेऊन परत येतात. एका दिवसात तीन वेळा तरी असा प्रवास करणे म्हणजे थेट शरीरावर अत्याचारच!.Seena River Flood : पूरग्रस्त गावातील पशुधनाला चारा वाटप.सायकलही वापरता येत नाही, त्यामुळे उन्हात, वाऱ्यात, घामाने डबडबलेले कपडे घालून ते पायपीट करतात. नामदेव माळींच्या या शब्दांमध्ये फक्त त्यांची नाही, तर हजारो पूरग्रस्त शेतकऱ्यांची हाक दडलेली आहे. नामदेव माळींची कहाणी म्हणजे सीना नदीकाठच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या दुर्दशेचे जिवंत चित्र..Solapur Flood: अतिवृष्टीमुळे बाधित ९५ गावांपैकी ७४ गावांचा वीजपुरवठा सुरळीत.शासनाने फक्त घोषणा न करता, प्रत्यक्ष गावात जाऊन पाहिले पाहिजे की, गरीब शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचते का ? आज शेतकरी चाऱ्याअभावी जनावरे वाचवण्यासाठी पायपीट करतोय, उद्या जनावरे मरू लागली तर त्याच शेतकऱ्यांचा संसार कोलमडेल. अशा वेळी सरकार, सामाजिक संस्था आणि स्थानिक जनता मिळून जनावरं वाचवण्याची चळवळ उभी करावी लागेल ..गावात कधी कधी चारा वाटला जातो बरं का, पण तो चारा आमच्यापर्यंत पोहोहोचत नाही. म्हणून आम्हाला जनावरं जगविण्यासाठी अशी रोजच पायपीट करावी लागतेय.- नामदेव माळी, पशुपालक, उंदरगाव..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.