Farmer Protest: कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी (ता. १) ऊसतोडणी दबकत सुरू होती. दराबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने शेतकरी संघटनांचे आक्रमक आंदोलन सुरू होते. जिल्ह्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत तोडणी सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले.