बावनकुळे म्हणाले, सरकार अलर्टवर, एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाहीपंतप्रधान आवास योजनेतील ३० लाख घरांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णयआगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनिती ठरणारओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही.Maharashtra Farmers Compensation: राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर पूरग्रस्त शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ हजार ६२८ कोटींच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले. २९ प्रभावित जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त २५३ तालुके आणि २०५९ मंडळांत मदतीसाठी ६५ मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, यात अजूनही काही तालुक्यांचा समावेश होईल, असे म्हटले आहे. ते शुक्रवारी (दि.१०) मुंबईत माध्यमांशी बोलत होते. .''शेतकरी प्रश्नी सरकार अलर्ट आहे. पंचनामे करण्यापासून ते नुकसान भरपाई पॅकेजपर्यंत, सरकार आपली भूमिका पार पाडत आहे. आमचे दौरे कशासाठी तर या पॅकेजपासून एकही शेतकरी वंचित राहू नये. कृषी आणि महसूल खात्याने केलेल्या पंचनाम्यातून कुणी सुटलाय काय? हे पाहिले जाईल. अजूनही काही तालुक्यांचा, काही क्षेत्रांचा त्यात समावेश होईल. त्यामुळे आमचा हा प्रवास शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आहे,'' असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. .Farmer Loan Waiver: संपूर्ण कर्जमाफी, ५० हजार एकरी मदतीसाठी शेतकरी आणि शेतमजूरांचे राज्यभर आंदोलन.'पंतप्रधान आवास योजनेच्या घरांना मोफत वाळू मिळणार' दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेच्या घरांना मोफत वाळू मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी ३० लाख घरे पंतप्रधान आवास योजनेतर्गंत मंजूर केली आहेत. या ३० लाख घरांना मोफत विनारॉयल्टी वाळू मिळेल. ज्या ग्रामपंचायतीमध्ये वाळू आहे; त्यातील ९० टक्के वाळूचा लिलाव होईल. तर १० टक्के वाळू राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बावनकुळे म्हणाले. .Farmer Compensation : ई-केवायसी न करता मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर.आगामी निवडणुकीसाठी रणनिती ठरणारआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मी असे आम्ही तिघेही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आमचे स्थानिक नेते आणि स्थानिक कोअर कमिटीशी चर्चा करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करत असताना महायुतीला कसे सांभाळले जाईल? यावरही चर्चा होईल. .'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही'त्यांनी आरक्षणाबाबतही भूमिका स्पष्ट केली. ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेत असल्याचे ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.