Solapur News : माळशिरस तालुक्यातील २२ गावांच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी नीरा देवघरचे पाणी मिळणे गरजेचे आहे. आम्ही संबंधित विभागाला काम सुरू करण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी देत आहोत. .काम सुरू झाले नाही तर मंत्रालयात घुसून आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही. सरकार बहिरे झाले आहे. त्याच्या कानावर शेतकऱ्यांची हाक जात नाही. या सरकारला जाग आणण्यासाठी आमचा लढा सुरू असल्याची आक्रमक भूमिका माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. .गारवाडपाटी (ता. माळशिरस) येथे नीरा देवघर पाणी संघर्ष समितीच्यावतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनात खासदार मोहिते पाटील बोलत होते. यावेळी आमदार उत्तमराव जानकर, संग्रामसिंह जहागीरदार, शहाजी ठवरे, बाबासाहेब माने, पांडुरंग वाघमोडे, गौतम माने, तुकाराम देशमुख, अप्पा कर्चे, दत्ता मगर, अजय सकट, सादिक सय्यद, सुरेश टेळे, डॉ. मारुती पाटील, विष्णू घाडगे व शेकडोंच्या संख्येने २२ गावातील नागरिक उपस्थित होते..Anjani Water Project : ‘अंजनी’सह चारही प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’.खासदार मोहिते पाटील म्हणाले, सरकारकडे हजारो कोटी रुपयांचे रस्ते करण्यासाठी पैसे आहेत. पण शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या नीरा देवघरच्या पाणी योजनेसाठी पैसे नाहीत. .Water Project : खानदेशात जिल्हा परिषदेच्या पाणी योजना रखडल्या.गेली ३० वर्षे सरकार माळशिरस तालुक्याला पाणी देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. आमदार जानकर म्हणाले, सरकारला जाग आणण्यासाठी, या नीरा देवघरच्या पाण्यासाठी मी विधानसभेत प्रश्नही विचारला. नीरा देवघरच्या पाण्याच्या प्रकल्पाइतका कोणताही जुना प्रकल्प महाराष्ट्रात मागे राहिला नाही..या गावांसाठी होतेय पाण्याची मागणीपिंपरी, फडतरी-निटवेवाडी, लोणंद, लोंढे - मोहितेवाडी, गिरवी, भांब, रेडे, कण्हेर, गोरडवाडी, इस्लामपूर, कारुंडे, कोथळे, चांदापुरी, जळभावी, तरंगफळ, पठाणवस्ती, सुळेवाडी, शिंगोर्णी, बचेरी, गारवाड, झिंजेवस्ती, काळमवाडी व पिलीव..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.