Nagpur Winter Session: अधिवेशनात नऊ हजार प्रश्नांची सरबत्ती
Nagpur Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (ता. ८) नागपुरात सुरू होत आहे. विधिमंडळाच्या सदस्यांद्वारे विविध आयुधांचा वापर करून या वेळी प्रश्न मांडले जातात. त्यानुसार यंदाच्या अधिवेशनासाठी तब्बल नऊ हजारांवर प्रश्न सादर करण्यात आले आहेत.