Ahmednagar Dam Water Discharge: अहिल्यानगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर स्थिर ठेवून विसर्ग सुरू केल्यानंतर आता नीळवंडे धरणाचाही पाणीसाठा ९५ टक्क्यांवर स्थिर ठेवून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रवरा नदीला पूर आला आहे. .सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंत भंडारदरा धरणातून ७ हजार १७६ क्युसेक, तर नीळवंडे धरणातून १३ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. मुळा धरणातही पाण्याची जोरदार आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा ६० टक्क्यांवर (सुमारे साडेपंधरा टीएमसी) पोहोचला आहे..Bhandardara Dam: भंडारदरा, हरिश्चंद्रगड पट्ट्यात मुसळधार पाऊस कायम.अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. भंडारदरा धरण दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ ऑगस्टपूर्वी भरण्याच्या मार्गावर आहे. भंडारदरा धरणातील पाणी नीळवंडे धरणात येत असल्याने पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला असून तेथून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी पुढे जायकवाडी धरणाकडे जात आहे..ओझर बंधाऱ्यातूनही विसर्ग सुरू आहे. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कायम आहे. सोमवारी (ता. २७) सकाळी सहा वाजेपर्यंतच्या २४ तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भंडारदरा येथे ९२ मिलिमीटर, नीळवंडे येथे ४५ मिलिमीटर, आढळा येथे ११ मिलिमीटर, अकोले येथे १८ मिलिमीटर, रतनवाडी येथे १२३ मिलिमीटर, घाटघर येथे ९२ मिलिमीटर, पांजरे येथे ६१ मिलिमीटर आणि वाकी येथे ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Maharashtra Dam Water Update: धरणांतील आवकेत वाढ.हरिश्चंद्रगड परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. कोतुळजवळील लहित खुर्द येथे मुळा नदीतून १२ हजार ४१ क्युसेक वेगाने पाणी धरणात दाखल होत होते..गेल्या २४ तासांत मुळा धरणात सुमारे एक टीएमसी पाण्याची भर पडली आहे. अशीच आवक कायम राहिल्यास मुळा धरणही लवकर भरेल, अशी आशा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान, अकोले तालुक्यातील भोजापूर आणि आढळा ही धरणे शंभर टक्के भरली आहे. इतर भागांत जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.