Buldhana News: जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम बोराळा बुद्रुक शिवारामध्ये महावितरणने लावलेले रोहित्र अतिरिक्त दाबामुळे वारंवार जळत होते. याचा फटका शेतकऱ्यांना झेलावा लागत असे. अखेर शेतकरी नेते अक्षय पाटील व सहकाऱ्यांनी आंदोलन करीत या मुद्याला वाचा फोडली. प्रशासनाने त्याची दखल घेत तातडीने जास्त क्षमतेचे रोहित्र बसवून दिले आहे. .वीज रोहित्राच्या मुद्यावर सोमवारी (ता.नऊ) अक्षय पाटील यांनी शेतकऱ्यांसह महावितरण कार्यालयात ठिय्या दिला. बोराळा बुद्रुक येथे लावलेले ६३ क्षमतेचे रोहित्र बदलण्याची मागणी केली. वारंवार हे रोहित्र जळत होते. .Farmers Protest: ‘संयुक्त किसान मोर्चा’चे देशव्यापी अभियान.अधिकारीही समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करीत होते. हातातोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, कांदा व इतर पिकांना पाणी देता येत नव्हते. या मुद्यावर शेतकऱ्यांना सोबत घेऊन जळगाव जामोद महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधत धारेवर धरले. .Electricity Protest: नवीन वीज दरवाढ लागू केल्यास तीव्र आंदोलन.त्यानंतर ३ तास झालेल्या आंदोलनाची दखल घेत मलकापूर येथील कार्यकारी अभियंता मिश्रा यांनी नवीन १०० क्षमतेचा रोहित्र बसवून देण्याचे सांगितले. त्यांनतर आंदोलन स्थगित करण्यात आले. नव्या रोहित्रामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाचणार आहे. .आंदोलनात शेतकरी अशोक राखुंडे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष अजय गिरी, अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोडकार, वैभव जाणे, आकाश आटोळे, अमोल बहादरे, त्रिलोकसिंह राजपूत, सागर वाघ, विजय रायपुरे, गणेश तायडे, सदाशिव जाणे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.