Solapur News : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी माळढोकचा अधिवास आणि वनजमिनीचे निर्वनीकरण हे दोन मुद्दे अडचणीचे आहेत. बोरामणी-गंगेवाडी परिसरात माळढोक असल्याचे २०१८ मध्ये आढळले होते. या सर्वेक्षणाला आता सात वर्षे झाली आहेत. .आम्हाला या भागात माळढोक आढळत नाही, आपण या भागात नव्याने सर्व्हेक्षण करावे अशी विनंती डेहराडून (उत्तराखंड) येथील भारतीय वन्यजीव संस्थानला (वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली..Great Indian Bustard : कृत्रिम गर्भधारणेतून ‘माळढोक’प्रजननाचा प्रयोग यशस्वी.या सर्व्हेक्षणानंतर बोरामणी परिसरात माळढोकचा अधिवास आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. या भागात माळढोक न आढळल्यास येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाचा एक प्रश्न सुटणार आहे. त्यानंतर विमानतळ परिसरात येणाऱ्या ३३ हेक्टर जमिनीच्या निवर्णिकरणाचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. .बोरामणी विमानतळाच्या अनुषंगाने असलेल्या अडचणी, त्यातून काढला जाणारा मार्ग या संदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (ता. २१) व्हीसीद्वारे बैठक घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. या बैठकीला संबंधित भूसंपादन अधिकारी, वन व वन्यजीव विभागाचे अधिकारी यांच्यासोबत व्हीसीद्वारे बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले..Great Indian Bustard: माळढोक अभयारण्याच्या राखीव क्षेत्रात सोडले घातक रसायन .आयटी पार्कसाठी पथक बुधवारी भुवनेश्वरलासोलापूरच्या आयटी पार्कसाठी उद्योजकांना कोणत्या सुविधा द्याव्यात, इतर राज्यात कोणत्या सुविधा दिल्या जातात? याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी सोलापूरचे पथक बुधवारी (ता. २४) भुवनेश्वरला जाणार असल्याची माहिती आशीर्वाद यांनी दिली..या पथकात उपजिल्हाधिकारी सीमा होळकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राठोड, कौशल्य विकासचे उपसंचालक व आयटी असोसिएशनचा एक पदाधिकारी असणार आहे. भुवनेश्वर येथील आयटी पार्कचा अभ्यास करून सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.