Nahsik News : न्यायालये ही न्यायाधीश यांच्यासोबतच पक्षकार आणि वकिलांची आहेत. त्यामुळे सर्वांसाठी सुविधा येथे निर्माण केल्या गेल्या आहेत. कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात, मात्र, ही सुंदर इमारत प्रत्येकाने नक्की पाहिली पाहिजे. .नाशिक न्यायालयाला १४० वर्षाची परंपरा आहे. येथे हेरिटेज कक्ष निर्माण केला आहे. अतिशय उच्च अशी परंपरा या न्यायालयाला आहे, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कौतुक केले. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय नूतन आधुनिक इमारतीचे उद्घाटन व वाहनतळाचे भूमीपूजन सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या हस्ते शनिवारी (ता.२७) झाले. यावेळी ते बोलत होते. .Chief Justice of India: न्या. भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ.कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री.चंद्रशेखर, न्या. रेवती डेरे मोहिते, न्या. एम. एन. सोनम, न्या. आर. व्ही. घुगे, न्या. ए. एस. गडकरी, न्या. मकरंद कर्णिक, न्या. सारंग कोतवाल, न्या. जितेंद्र जैन, न्या. आश्विन भोबे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सिंग, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अमोल सावंत, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य जयंत जायभावे, ॲड. अविनाश भिडे यांचेसह बार कौन्सिल व वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते..Agriculture Crisis: सततच्या पावसाचा फळबागांना फटका.नाशिक वकील संघाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांना सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. स्वागतपर मनोगत नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ठाकरे यांनी तर इमारत उभारणीसाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. जायभावे यांनी मनोगत व्यक्त केले..आभार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जगमलानी यांनी मानले. या कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा,महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह वकील संघाचे प्रतिनिधी, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, वकील व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते..नव्या इमारतीची प्रमुख वैशिष्टयेसात मजली पर्यावरणपूरक इमारत.एकूण ४४ न्यायालयांचा समावेश.पोक्सो, महिलांसंदर्भातील खटले, एटीएस व सीबीआयसाठी स्वतंत्र कोर्ट..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.