Jalna News : कपाशी पिकात बीटी तंत्रज्ञानाच्या पुढील आवृत्ती आणण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलिया, इस्राईल, चीन यासारख्या देशांनी कपाशीतील बीजी-५ तंत्रज्ञान स्वीकारले, मात्र आपण अजून बीजी-२ मध्येच अडकून पडल्याची खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ, साउथ आशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी व्यक्त केली..भारतीय कृषी संशोधन परिषद संलग्न केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी व ॲग्रोव्हिजन फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे आयोजित कापूस शेतीदिन व पीक पाहणी कार्यक्रमात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे सचिव कृषिरत्न विजयअण्णा बोराडे तर उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे, कापूस पैदासकार डॉ. अनिल अनसिंगकर, मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभूषण भगवानराव काळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती..Cotton Farming: जुन्नरला ९० हेक्टरवर कापूस लागवड.डॉ. मायी म्हणाले की, कपाशीचे उत्पादन वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर हाच उत्तम पर्याय आहे. त्यासाठी सघन कापूस लागवड पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांनी आपले उत्पादन वाढवावे. कपाशीची लागवड जमिनीच्या पोतानुसार तीन बाय एक फूट किंवा तीन बाय अर्धा फूट अंतरावर करून एकरी झाडांची संख्या १४ हजार ते २९ हजार ठेवावी तसेच वाढ नियंत्रणाचे योग्य उपाय करावा. नवीन बीटी वाणांचा वापर करून एकरी झाडांची संख्या २९ हजार ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. .कापूस वेचणीतील मजुरांची अडचण लक्षात घेऊन पुढील काळात एकाच वेळी कापसाची पानगळ करून यंत्राद्वारे कापूस करण्याच्या तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञ काम करत असून हे तंत्रज्ञान लवकरच भारतात येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बोराडे यांनी कापूस उत्पादन क्षेत्रात यांत्रिकीकरण आणण्याची गरज व्यक्त केली. उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे यांनीही आपले विचार व्यक्त केले. शेतकरी संताजी भोईटे (अंतरवाला) आणि गणेश आनंदे (मासेगाव) यांनी आपले सघन कापूस लागवडीचे अनुभव कथन केले. .यावेळी डॉ. मायी यांच्या गेल्या ५० वर्षातील कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांच्या हस्ते त्यांचा स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कापूस उत्पादनात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल जिल्ह्यातील जगदीश जाधव (कचरेवाडी), शिवहरी डोंगरे (सावरगाव हडप), भारत मुळे (बाबुलतारा), गणेश आनंदे (मासेगाव), तुकाराम भुतेकर (शिंदे वडगाव), ज्ञानेश्वर ढाकणे (सोनदेव) आणि भाऊसाहेब चव्हाण (गोसावी पांगरी) यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ प्रास्ताविक डॉ. सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी यांनी तर आभार प्रदर्शन कृषी विज्ञान मंडळाचे संस्थापक सदस्य बाबूराव कदम यांनी केले..Cotton Farming: कपाशी लागवडीत उत्पादन खर्च नियंत्रित करण्यावर भर.किमान ९ हजार प्रतिक्विंटल दर हवा...डॉ. मायी म्हणाले की, कापूस पिकात सातत्याने संशोधन होऊन नवीन नवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. कापसाचे भाव सातत्याने खालीवर होत असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. या वर्षी अवेळी आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. .कपाशीला किमान नऊ हजार प्रती क्विंटल भाव मिळाल्याशिवाय कापूस उत्पादन करणे परवडत नाही. अशा परिस्थितीत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कापूस उत्पादकतेत वाढ केल्याशिवाय व कापूस उत्पादनावरील खर्च कमी केल्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय नाही. जमिनीतील सेंद्रिय कर्ब प्रचंड कमी झाला असून त्यात सुधारणा केल्याशिवाय अपेक्षेनुसार कापूस उत्पादन येणार नाही. त्यासाठी बायोचर पद्धतीचा वापर करण्याची शिफारस त्यांनी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.