Government Support: देशातील काही बाजारांत नव्या कापसाची आवक सुरु झाली आहे. हरियाना, पंजाब, कर्नाटक, तेलंगणात काही बाजारांमध्ये नवा कापूस दाखल झाला. पण आवक अजून वाढलेली नाही. लवकर लागवड झालेला कापूसच सध्या वेचणीच्या टप्प्यात आला आहे. त्याचे प्रमाणही कमी आहे. तसेच या कापसात ओलावा अधिक असल्याने तो प्रति क्विंटल ६५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी ७७१० रुपये तर लांब धाग्याच्या कापसासाठी ८११० रुपये हमीभाव जाहीर केला. सध्याचा भाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहे..आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव दबावात आहेत. तसेच सरकारने कापूस आयातीवरील शुल्क काढले आहे. त्यामुळे देशात कापसाचे भाव जास्तच दबावात आले आहेत. कापूस दरावरील दबाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा हमीभावाने कापूस विक्रीचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. शेतकऱ्यांनी हमीभावाने कापूस विक्रीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन देखील अभ्यासक करत आहेत..ऑक्टोबरपासून बाजारात कापसाची आवक वाढत जाईल. तर दुसरीकडे बाजारभाव दबावातच राहतील. त्यामुळे सीसीआयला यंदा मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करावा लागणार आहे. तशी तयारीदेखील सीसीआय करत आहे. यंदा १५० लाख गाठींच्या दरम्यान खरेदीची तयारी करत असल्याचे सीसीआयने स्पष्ट केले आहे. नव्या हंगामात जास्त खरेदी करावी लागू शकते म्हणून सीसीआयने २०२४-२५ मधील सर्व कापूस विक्रीचे नियोजन केले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सीसीआकडे २७ लाख गाठी कापूस होता..Cotton Rate: उत्तर भारतातील काही बाजारांमध्ये नव्या कापसाची आवक सुरु.सरकारने कापूस आयात शुल्क काढल्यापासून सीसीआयने कापूस विक्रीचे भाव २ हजाराने कमी केले होते. तसेच १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान कापूस विक्रीसाठी आणखी ४०० ते ६०० रुपयांनी भाव कमी केले. त्यामुळे या १५ दिवसांमध्ये सीसीआयने १५ लाख गाठी कापूस विकला. त्यानंतर सीसीआयकडे १२ लाख गाठी कापूस शिल्लक होता. हा कापूसही ३० सप्टेंबरपर्यंत विकण्याचे सीसीआयने उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी कमी केलेले भाव कायम ठेवले आहेत..सीसीआय यंदा तीन टप्प्यात खरेदी करणार आहे. देशभरात ५५० खरेदी केंद्रे सुरु होतील. त्यापैकी १५० खरेदी केंद्रे महाराष्ट्रात असतील. पंजाब, हरियाना, राजस्थानमध्ये कापसाची लागवड लवकर होते. तसेच अनेक भागांत कापूस वेचण्याच्या टप्प्यात येत आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये खरेदी १ ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात १५ ऑक्टोबरपासून खरेदी होणार आहे. तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकात २१ ऑक्टोबरपासून खरेदी सुरु होईल. सीसीआय ८ ते १२ टक्क्यांच्या दरम्यान ओलावा असलेला कापूस खरेदी करते. मात्र सुरुवातीला कापसामध्ये ओलावा अधिक असतो. त्यामुळे सीसीआयने कापूस खरेदीचे नियम शिथिल करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत..Cotton Crisis: कमी दर, नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस उत्पादक चिंतेत.देशात यंदा कापसाची लागवड ३ टक्क्यांनी कमी झाली. जवळपास १०९ लाख हेक्टरवर यंदा लागवड स्थिरावली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये यंदा लागवड कमी झाली. तर उत्तर भारत आणि दक्षिण भारतात लागवड काहीशी अधिक आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत अनेक भागात पिकाची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे देशात यंदा लागवड कमी झाली तरी कापसाचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला होता. मात्र सप्टेंबर महिन्यातही कापूस उत्पादक भागात कापूस पिकाला मोठ्या प्रमाणात पावसाने दणका दिला..पंजाब, हरियाना आणि राजस्थानमध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्तर भारतात कापूस पीक बोंड भरण्याच्या आणि कापूस वेचणीच्या टप्प्यात पीक आहे. या पिकाचे नुकसान होत आहे. तसेच महाराष्ट्रातही गेले आठवडाभर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात कापूस पीक फुले आणि बोंडे लागण्याच्या टप्प्यात आहे. त्यामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान होत आहे. गुजरातमध्येही पिकाचे नुकसान झाले. कर्नाटक, तेलंगणातही पावसाचा फटका बसला. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन कमीच राहील, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.