Hingoli News : जिल्ह्यासाठी कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ४८ कोटी ९८ लाख रुपये निधीचा लक्षांक आहे. यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गंत २ हजार ८३१ भौतिक लक्षांकानुसार अल्पभूधारक, अत्याल्पभूधारक, महिला, अनुसूचित जाती, जमाती आदी वर्गवारीतील शेतकऱ्यांना प्राधान्याने विविध घटकांचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..वातावरणातील बदलामुळे येणारी संकटे आपत्ती,घटती उत्पादकता आदी आव्हानांना सामोरे जात शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासह शाश्वत विकासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत निर्मितीवर भर देणारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व मापदंडानुमार, थेट लाभ हस्तांतर तत्त्वांवर २०२५-२६ पासून कृषी समृद्धी योजना शासनाने नव्याने सुरू केली आहे..Krushi Samruddhi Yojana: नुकसानग्रस्तांना ‘कृषी समृद्धी’तून लाभ.कृषी समृद्धी योजनेअंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२५-२६ करिता विविध घटकांचा भौतिक व आर्थिक घटकनिहाय लक्षांक प्राप्त झाला आहे. अनुदानित घटकासाठी केंद्र, राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या घटकातील देय अनुदान प्रमाण व मर्यादा लागू असतील. प्रचलित मापदंड राज्य शासनामार्फत निश्चित करण्यात येतील. या योजनेत प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभ देण्यात येईल. योजनेअंतर्गत शेतकरी, महिला गट उत्पादक कंपन्यांना प्राधान्य देण्यात येईल. .Krushi Samruddhi Yojana : कृषी समृद्धीचा आराखडाच नाही.अल्प, अत्यल्प भूधारक, महिला शेतकरी, अनुसूचित जाती, जमातीचे शेतकरी, दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील. हिंगोली जिल्ह्याकरिता लागवड साहित्य ४०, क्षेत्र विस्तार १९०, फळबाग पुनरुज्जीवन १२२, मधुमक्षिका पालन ५५, आळंबी उत्पादन २०, हरित गृह १०, शेडनेट ७१, प्लॉस्टिक मल्चींग ११३, फळकव्हर ६०, तण नियंत्रण आच्छादन ३०, सामूहिक शेततळे ३०, ट्रॅक्टर २७२, पॉवर टिलर २७०, इतर अवजारे २९६, पॅक हाऊस ७३५, कांदाचाळ ४५०, प्राथमिक प्रक्रिया ५, रेफर व्हॅन २, शीतगृह १, शीत खोली ५, एकात्मिक पॅक हाऊस २ असे एकूण २ हजार ८३१ भौतिक लक्षांक आणि ४८ कोटी ९८ लाख रुपये आर्थिक लक्षांक प्राप्त झाला असून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली नोंदणी करावी. .महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळावर शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे..हिंगोली जिल्ह्यासाठी निधी व लक्ष्य:एकूण आर्थिक लक्षांक: ४८.९८ कोटीएकूण भौतिक लक्षांक (उपयोजनांची संख्या) : २८३१योजनेची वैशिष्ट्ये२०२५-२६ पासून योजना सुरु.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर ही योजना राबवली जाते.थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer - DBT) तत्त्वावर आधारित.केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राबवली जाईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.