Nepal Flood Situation: नेपाळ आणि तिबेटच्या सीमा भागात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठी जीवितहानी झाली. या आपत्तीतील मृतांचा आकडा ५४७ वर पोहोचला आहे. तर १४७३ लोक जखमी झाले असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. तर अचानक आलेल्या या पुरामुळे नेपाळ- चीन सीमेजवळ तयार झालेले एक मोठे जलाशय (बॅरियर लेक) फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे..हे जलाशय तुडुंब भरून वाहू लागल्याने नेपाळ आणि चीन या दोन्ही देशांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. माती, दगडांचा ढिगारा साचून तयार झालेला हा जलाशय फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होते. पण शुक्रवारी (ता.२८) दुपारपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चीनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे बचावकार्ये पुन्हा सुरू करण्यात आले..Nepal Flood Death Toll: नेपाळमध्ये पुन्हा महाप्रलयाचं संकट; 'बॅरियर लेक' फुटण्याचा धोका? मृतांचा आकडा ५४७ वर.रसुवा ते चितवन दरम्यानच्या नदीकाठी आणि बाधित भागांत शोधकार्यासाठी १२०० जणांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. येथील पूरपरिस्थितीची अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत देखरेख वाढवली आहे. जलाशयातील पाण्याचा प्रवाह वेगाने वाढल्याने सखल भागांमध्ये अचानक पूर येण्याची शक्यता आहे. .Nepal Flash Floods: नेपाळमध्ये जलप्रलय: मृतांचा आकडा ३५९ वर, ९०० हून अधिक लोक बेपत्ता, चीनच्या धरणामुळे नेपाळमध्ये विध्वंस? भारतातही अलर्ट.पुराचा धोका लक्षात घेऊन सखल भागांतील नागरिक उंच ठिकाणी स्थलांतर करत आहेत. अद्याप ९५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. यात ५०० हून अधिक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे..नेपाळने बचावकार्यासाठी मदत नाकारलीदरम्यान, नेपाळमध्ये शोध आणि बचावकार्यासाठी पथके पाठवण्याची तयारी अनेक देशांनी दर्शवली होती. पण नेपाळने मदत नाकारली आहे. आमची सुरक्षा यंत्रणा ही बचावकार्य हाताळण्यास सक्षम असल्याचे नेपाळ सरकारने म्हटले आहे. नेपाळ-चीन सीमेजवळ भोटेकोशी आणि त्रिशुली नदीच्या खोऱ्यांत बुधवारी अचानक भयंकर महाप्रलय आला. या महापुरामुळे सगळीकडे चिखल पसरला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.