Nepal And India Agreed To Expand Cooperation In Agriculture: शेती क्षेत्रातील सहकार्याबाबत द्विपक्षीय करारांना ठोस स्वरुप देण्यासाठी नेपाळ आणि भारत यांच्यात पुढील तीन महिन्यांत द्विवार्षिक कृती योजना तयार करून ती अंमलात आणण्यावर सहमती झाली आहे. याबाबतची माहिती नेपाळच्या कृषी आणि पशुधन विकास मंत्रालयाने दिली आहे..काठमांडू येथे नुकत्याच पार पडलेल्या नेपाळ-भारत संयुक्त कृषी कार्यगटाच्या नवव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशांनी भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि नेपाळ कृषी संशोधन परिषद (NARC) यासह दोन्ही देशांतील कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यावरही सहमती दर्शविली, असे मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे..दोन्ही देशांनी पशुधन, पोल्ट्री आणि मत्स्योद्योग क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शविली. याबाबत एका वेगळ्या सामंजस्य करारांतर्गत शिक्कामोर्तब करण्यात आले..Electric Agricultural Tractors: 'इलेक्ट्रिक ट्रॅक्टर'च्या बदललेल्या नियमांचा शेतकऱ्यांना फायदा काय?.रासायनिक खतांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी लॉजिस्टिक प्रक्रिया सुलभ करणे, शेतीसाठीच्या पायाभूत सुविधांच्या विकासात सहकार्य मजबूत करणे आणि अन्नधान्य गुणवत्ता मानके याच्याशी संबंधित तांत्रिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संबंधित संस्थांमध्ये नियमित संवाद साधण्याच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत..India-New Zealand FTA: भारत- न्यूझीलंड दरम्यान द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण.भारताच्या बाजूने आपल्या “शेजारील देशांना प्राधान्य” धोरणानुसार नेपाळसोबत कृषी संशोधन, तंत्रज्ञान देवाण- घेवाण आणि पायाभूत सुविधा विकासात सहकार्य वाढवण्याची बांधिलकी स्पष्ट करण्यात आली. .सध्याच्या सहकार्याच्या प्रगतीबाबत नेपाळकडून सांगण्यात आले आहे की, भारताकडून देण्यात आलेल्या १५ जातिवंत मुऱ्हा म्हैस जातीच्या रेड्यापासून आतापर्यंत ९२,७६६ डोस वीर्य निर्मिती झाली आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल यांच्या २०२३ मधील भारत भेटीदरम्यान झालेल्या करारानुसार नेपाळला मुऱ्हा जातीच्या म्हैस देण्यात आल्या होत्या. देशी म्हशींच्या जाती सुधारणे आणि नेपाळच्या पशुधन क्षेत्राला बळकटी देण्याचा यामागील उद्देश होता. पशुधन विकासासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल नेपाळकडून भारत सरकारचे आभार मानण्यात आले आहेत, असे मंत्रालयाने नमूद केले आहे..दरम्यान, नेपाळने त्यांच्या शेती उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत कोणत्याही अडथळ्याविना प्रवेश देण्याची विनंती केली आहे. डिजिटल शेती, हवामान अनुकूल शेती, नैसर्गिक शेती आणि अन्न सुरक्षेसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबतही द्विपक्षीय चर्चा करण्यात आली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.