Soldiers RestHouse: सैनिक विश्रांतिगृहाकडे दुर्लक्ष
Neglect Administration: माणगाव शहराच्या मध्यवर्ती भागात, कचेरी रोडलगत विद्यानगरच्या प्रवेशद्वाराजवळ वसलेले सैनिक विश्रांतिगृह अक्षरशः अखेरची घटका मोजत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या वास्तूकडे शासन व प्रशासनाचे दीर्घकाळापासून दुर्लक्ष झाल्याने ती पूर्णतः जीर्णावस्थेत पोहोचली असून, देशसेवेच्या प्रतीक असलेल्या या वास्तूच्या भवितव्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.