Fly Ash Management: कोळसा खाणीतून निर्माण होणाऱ्या राखेच्या विल्हेवाटीची समस्या गंभीर बनली असताना, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) यांनी विकसित केलेल्या ‘निसर्ग पुनरुज्जीवन तंत्रज्ञानामुळे (Eco Rejuvenation Technology – ERT) सुमारे १५०० एकर पडीक जमीन पुन्हा सुपीक करण्यात यश आले आहे. या तंत्रज्ञानामुळे फ्लाय ॲशमुळे बाधित जमिनींचे पुनर्वसन शक्य झाले आहे.