Agriculture Economy: वाढता उत्पादन खर्च, स्थिर साखर दर आणि अपुऱ्या धोरणात्मक सुधारणांमुळे देशातील साखर उद्योग आर्थिक संकटात सापडला आहे. यात सरकारने तातडीने धोरणात्मक सुधारणा करून उद्योगाला दिलासा द्यावा, अशी मागणी विश्वास साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी केली..श्री. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गेल्या दशकात ऊसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) २,३०० रुपयांवरून ३,५५० रुपयांपर्यंत म्हणजे ५४ टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, त्याच काळात तोडणी आणि वाहतूक खर्च ४९४ रुपयांवरून ९५८ रुपयांपर्यंत, म्हणजेच ९४ टक्क्यांनी वाढला आहे. २०१४-१५ मध्ये एफआरपीच्या १८ टक्के असलेला हा खर्च आता २८ ते ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे..Sugar Industry: साखर उद्योगाला मोठा दिलासा, साखरेची 'एमएसपी', कर्जाच्या पुनर्गठणावर १० दिवसांत निर्णय, अमित शहांकडून आश्वासन.कारखान्यांच्या अर्थकारणावरही मोठा ताण निर्माण झाला आहे. २०२४-२५ मध्ये एका टन उसावरील कारखान्याचा एकूण खर्च सुमारे ५,२५० रुपये इतका आहे. १२ टक्के उताऱ्यानुसार साखर विक्री व उपपदार्थांमधून केवळ ४,९०० रुपये उत्पन्न मिळत असल्याने प्रति टन सुमारे ३५० रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला. .Sugar Industry: सरकारची साखर झोप.गेल्या दहा वर्षांत एफआरपीमध्ये ५४ टक्के वाढ झाली असताना बाजारभावात केवळ १६.१२ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय, साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) २०१९ पासून प्रतिकिलो ३१ रुपयांवर स्थिर असून उत्पादन खर्च प्रतिकिलो ४३ रुपयांपेक्षा अधिक झाला आहे..प्रमुख मागण्यासाखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) तातडीने प्रतिकिलो ४३ ते ४४ रुपये करावा.इथेनॉलचे दर एफआरपीशी संलग्न करून दरवर्षी पुनर्निर्धारित करावेत.तोडणी व वाहतूक खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणाला चालना द्यावी.साखर, इथेनॉल आणि वीज यांवरील एकत्रित उत्पन्नाशी संलग्न महसूल-वाटप मॉडेल विकसित करावे.साखर उद्योगाला पुरेसे खेळते भांडवल मिळण्यासाठी बँकिंग धोरणात सुधारणा करावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.