Dharashiv News: भूजलाचे व्यवस्थापन हे केवळ एका विभागापुरते मर्यादित न राहता सर्व विभाग व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून होणे आवश्यक आहे. केंद्रीय भूजल विभाग व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या डेटाबेसचा समन्वित व व्यापक वापर करून जिल्हास्तरीय नियोजन अधिक परिणामकारक करता येईल. भूजल व्यवस्थापनासाठी गावपातळीवरील जलसुरक्षा आराखडे, पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरणांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे मत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी व्यक्त केले..जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. ३०) आयोजित केंद्रीय भूजल विभागाच्या भूजल माहिती भंडार तसेच जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. शासकीय कार्यालयांमध्ये निर्माण होणाऱ्या मौल्यवान माहिती भांडाराचा स्थानिक भूजल व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये अधिकाधिक प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय भूजल विभागाच्या वतीने एक अभिनव व आश्वासक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. .Groundwater Management: शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी वैज्ञानिक माहितीचा वापर करावा.यात केंद्रीय भूजल विभागाचा तळागाळापर्यंत सखोल परिचय व्हावा, विभागातील भूजल वैज्ञानिकांचे कार्य व त्याचे महत्त्व सर्व संबंधित विभागांना समजावे, या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष व अतिरिक्त पोलिस अधीक्षक शफकत आमना या वेळी उपस्थित होत्या. डॉ. घोष यांनी भूजलविषयक अद्ययावत व विश्वासार्ह डेटा उपलब्धतेचे महत्त्व अधोरेखित करत,अंतिम वापरकर्ते व विविध अंमलबजावणी यंत्रणांनी या माहितीचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करत विशेषतः ग्रामस्तरीय जलसुरक्षा योजना तयार करताना या संसाधनांचा सक्रिय वापर करण्याचा सल्ला दिला. .Groundwater Management: भूजलाचा वापर हवा जपूनच.कार्यशाळेत पुण्याच्या केंद्रीय भूजल विभागाचे वरिष्ठ भुवैज्ञानिक डॉ. उपेंद्र धोंडे यांनी केंद्रीय भूजल विभागांतर्गत निर्माण माहिती, संसाधनांचा प्रसार आणि उपयोगावर सविस्तर तांत्रिक सादरीकरण केले. त्यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी राष्ट्रीय एक्विफर मॅपिंगचे निष्कर्ष मांडून डेटा पोर्टल, आयएनजीआरईएस आणि डब्लूआरआयस या प्रणालींचा वापर करून क्षेत्रीय पातळीवर नियोजन व निर्णय प्रक्रिया अधिक शास्त्रीय कशी होऊ शकते, याचे प्रात्यक्षिक दाखवले. या प्रसंगी कृत्रिम पुनर्भरण संरचनांच्या यशोगाथा या कॉफी टेबल पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. या कार्यशाळेला भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जलसंपदा विभाग, मृदा व जलसंधारण, जलसंधारण विभाग, लघु सिंचन, वन, कृषी विभाग व संबंधित शासकीय व निमशासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते..लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्यात कार्यशाळाही कार्यशाळा सध्या काही निवडक जिल्ह्यांमध्ये घेण्यात येत असून, पुढील टप्प्यात ती राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा मानस असल्याचे केंद्रीय भूजल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या उपक्रमामुळे केंद्रीय भूजल विभागाच्या कामाची व उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचून जलसंवर्धन आणि शाश्वत जलव्यवस्थापनासाठी नवी दिशा मिळेल, असा विश्वास या वेळी डॉ. धोंडे यांनी व्यक्त केला. कार्यशाळेचा समारोप संवादात्मक अभिप्राय सत्राने झाला. भूजल वैज्ञानिक व्ही. हेमलता यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.