Latur News: लातूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा वर विजयाची वाटचाल करत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष रूपात आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) मोठ्या संख्येने जागा मिळाल्याने हा पक्ष आता जिल्हा परिषदेत किंगमेकर ठरला आहे. .निकालाने अनेकांना धक्का दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या आशा भिसे या केवळ दोन मतांनी विजयी झाल्या असून रोहिणा गटातून माजी खासदार सुधाकर शृंगारे यांची मुलगी सुप्रिया शिंगारे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे..Local Body Results: नांदेड वाघाळा महापालिकेत भाजपचे वर्चस्व.आमदारपुत्र ऋषीकेश कराड यांना उमेदवार नाकारलेल्या पानगाव (ता. रेणापूर) गटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजी मारली आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढत या निवडणुकीत किंगमेकर होण्याची शक्यता वर्तवली होती. .Local Body Result: सावंतवाडी, वेंगुर्लेत भाजप, मालवणात शिंदे शिवसेना .मात्र या निवडणुकीत या पक्षाला ६० पैकी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तेच किंगमेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न जिल्हा परिषद निवडणुकीत सत्यात उतरत आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागेपैकी भाजप १८, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) १२, शिवसेना १ जागांवर विजयी झाले आहेत..शिवसेना (युबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली असून अपक्षांना दोन जागेवर संधी मिळाली आहे. काँग्रेस २३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तरी भाजप व युतीतील घटक पक्षाला चांगल्या जागा मिळाल्यामुळे कॉंग्रेसचे सत्तेचे स्वप्न तुर्त धूसर आहे. दहा पंचायत समित्यांपैकी महायुतीच्या ताब्यात सातहून अधिक पंचायत समित्या रहाण्याची शक्यता असून तीन पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस व आघाडीला कौल दिसून येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.