Nashik News: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पांडुरंग पगार (वय ६४) यांचे अल्प आजाराने मंगळवारी (ता. ३) निधन झाले. बुधवारी (ता. ४) दुपारी मूळगावी उत्राणे (ता. बागलाण) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले..सन २०१२ पासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्री छगन भुजबळ यांचे ते निकटवर्तीय मानले जात. त्यांनी महापालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणूनही प्रभावीपणे काम केले होते. संघटनात्मक कामकाजाचा तब्बल ४० वर्षांचा अनुभव असलेल्या अॅड. पगार यांनी काँग्रेसमध्ये युवक काँग्रेस, तसेच एनएसयूआय या विद्यार्थी संघटनांचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले होते..IAS Ravindra Thackeray: माहिती अधिकाराचे ज्ञान अधिकाऱ्यांनाच नाही.पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून तसेच विविध जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. सन १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यावर राज्यात सर्वप्रथम नाशिक येथे शरद पवारांच्या समर्थनार्थ भव्य मेळावा आयोजित करण्याची ऐतिहासिक भूमिका पगार यांनी बजावली होती. .Ajit Pawar Death: राज्यात बाजार समित्या बंद.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत अजित पवार व मंत्री भुजबळ यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यावरही अॅड. पगार यांनी दोन्ही नेत्यांच्या पाठीशी संपूर्ण संघटना एकसंघ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती..‘राष्ट्रवादी’च्या प्रदेश अधिवेशनात अनेकदा भूमिका मांडण्याची संधीही त्यांना देण्यात आली होती. त्यांच्या निधनाने एक निष्ठावान, अनुभवी व संघटनात्मक ताकद असलेले नेतृत्व हरपल्याची भावना कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांकडून व्यक्त केली जात असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमीच कटिबद्ध राहिले. ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठोस भूमिका घेतली. त्यांच्या निधनाने एक कुशल संघटक, अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.- छगन भुजबळ, मंत्री.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.