Navi Mumbai News: होळीनंतर नवी मुंबईत कडक उन्हाळा सुरू झाला असून, पारा ४० अंशापर्यंत गेला असून, अनेकांना उष्म्याचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे शरीराला थंड ठेवण्यासाठी नवी मुंबईकर सध्या नारळपाण्याला पसंती देत आहे. शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर शहाळ्यांची विक्री होत असून, त्याच्या किमतींमध्येदेखील २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे..उन्हाच्या झळा वाढल्याने, तसेच रमाजान महिना सुरू असल्यामुळे फळांनाही मागणी वाढली आहे. बाजारपेठेतही सध्या नारळपाण्याला पसंती मिळत असून, शहरात ठिकठिकाणी नारळपाण्याचे स्टॉल पाहायला मिळत आहेत. भरदुपारी रस्त्याने फिरताना नागरिक रसवंती, नीरा, ज्यूस स्टॉलवर गर्दी करताना दिसत आहेत, तर अनेक जण आजारपणाला आमंत्रण नको, म्हणून नारळपाणी पिण्याला प्राधान्य देत आहेत..Summer Heat : उष्णतेचा फळपिकांना मोठा फटका.नारळपाणी आरोग्यासाठी गुणकारी असून, आरोग्यासाठी फायदेशीर असे घटक आढळतात. त्यामुळे बाहेरील शीतपेय पिण्यापेक्षा लाभदायक असे नारळपाणी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे नारळविक्रेत्यांकडेही यंदा मोठ्या प्रमाणावर नारळ विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. नारळाला मागणी वाढल्याने शहरातील चौक, रस्त्याच्या कडेला नारळविक्रेत्यांकडे गर्दी दिसून येत आहे. अगदी ६० रुपयांपासून ते ९० रुपयापर्यंत नारळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पाणीदार नारळासह मलईयुक्त नारळाचा आस्वाद घेण्यात येत आहे..Heatwave Alert: पालघरमध्ये उन्हाचे चटके.नारळपाणी प्यायल्याने शरीराला इलेक्ट्रोलाइट घटक मिळतात. नारळपाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. नारळपाणी प्यायल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित राहते.- डॉ. प्रतीक तांबे.शहाळ्याच्या भावात वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा यामध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे. ६० ते ९० रुपयांना नारळपाणी मिळत आहे. गतवर्षी हेच भाव ५० ते ८० रुपयांपर्यंत होते.- मोहम्मद जावेल, शहाळे विक्रेते.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.