Gondia News: नवेगावबांध परिसरात सोमवारी (या. २३) मध्यरात्रीनंतर वातावरणात अचानक बदल होऊन पहाटे पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळी सात ते आठ वाजेदरम्यान काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्याने रस्ते व सखल भागांत पाणी साचले. या अवकाळी पावसामुळे कडधान्य, भाजीपाला आणि आंबा पिकांना मोठा फटका बसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली..गेल्या आठवडाभरापासून परिसरात उकाडा वाढू लागला होता. उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. मात्र हा दिलासा तात्पुरता ठरला असून, रब्बी हंगामातील हरभरा, गहू, उडीद, मूग, वाटाणा तसेच सूर्यफूल यांसारख्या पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेले कडधान्य पीक ओलाव्यामुळे खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे..Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा ३७ हजार हेक्टरवरील पिकांना दणका; तातडीने पंचनामे करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश.भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका बसला असून वांगे, भेंडी, गवार, चवळी, मिरची, टोमॅटो, काकडी, टरबूज, खरबूज आदी पिके सध्या उत्पादन अवस्थेत आहेत. पावसामुळे पिकांवर डाग, कुज आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. परिणामी बाजारपेठेत आवक घटून दरात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..Unseasonal Rain: गारपीट, वादळी पावसाचा रब्बी पिकांना तडाखा; तातडीने मदतीची मागणी.दरम्यान, परिसरात आम्रवृक्षांना मोठ्या प्रमाणावर बहर आलेला आहे. फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या आंबा बागांमध्ये पावसामुळे फूलगळ झाली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी संभाव्य आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली आहे. सध्या काही भागांत रब्बी हंगामातील धान रोवणीची कामे सुरू असून, या पावसाचा त्यांना काही प्रमाणात फायदा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र एकूणच कडधान्य व भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. हवामान खात्याने पुढील दोन ते चार दिवस ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे..अवकाळी पावसामुळे भाजीपाला व कडधान्य पिकांचे निश्चित नुकसान होईल. ओलाव्यामुळे बुरशीजन्य रोग वाढतील तसेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढून पुढील पंधरा दिवस शेतकऱ्यांना त्याचा प्रादुर्भाव दिसू शकतो.- किशोर तरोणे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, नवेगावबांध.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.