Natural Farming: जालना जिल्ह्यात २७०० हेक्टरवर नैसर्गिक शेती
Chemical Free Farming: रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती करण्याचे प्रयत्न कृषी विभागाने सुरू केले आहेत.