Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जून ते २५ सप्टेंबर दरम्यान ११५ दिवसांत नैसर्गिक आपत्तीत सुमारे ८६ जणांचा बळी गेला आहे. याशिवाय १३ जण जखमी झाले आहेत..नैसर्गिक आपत्तीत बळी गेलेल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५, जालन्यातील ७, हिंगोलीतील ११, नांदेडमधील २६, बीडमधील ११, लातूरमधील ६ तर धाराशिवमधील ४ जणांचा समावेश आहे. जखमी झालेल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, नांदेडमधील पाच, बीडमधील तीन, तर लातूरमधील एका व्यक्तीच्या समावेश आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जून ते २५ सप्टेंबर दरम्यान सुमारे २३ लाख ९६ हजार १६२.९९ हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक आपत्तीचा आघात झाला आहे. महसूल प्रशासनाच्या आताच्या प्राथमिक अहवालात ही बाब नमूद आहे..१७२५ जनावरे दगावलीआजवरच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुमारे १७२५ जनावरे दगावली आहेत. ४५८ पक्क्या घरांची अंशतः पडझड, तर सुमारे ५२७७ कच्चा घरांची अंशतः पडझड झाली आहे. ५२ झोपड्यांचेही नुकसान झाले आहे. तर ८९ गोठ्यांचेही नुकसान झाले असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली..Marathwada Heavy Rains : मराठवाड्यात अतिवृष्टीनं हाहाकार! शेती उद्ध्वस्त, पीकं खरडून गेली, विहिरी पुराचं पाणी आणि गाळानं बुजल्या.२५ सप्टेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण झालेली क्षेत्र (हेक्टरमध्ये)छत्रपती संभाजीनगर १५७०१.११जालना १४०४४.८१परभणी १५३०८१.८हिंगोली २७३४१३.२६नांदेड ६५४४०१बीड २१६०४६.३०लातूर ३०३९१३.९५धाराशिव १८९४२९.९५.पीक नुकसान झालेली गावेछत्रपती संभाजीनगर ४९२जालना २९६परभणी ४२६हिंगोली ७०२नांदेड १३७४बीड १३१८लातूर ८१५धाराशिव ४७०.Rain Crop Damage : अतिवृष्टी पीकनुकसानीचे ८६ टक्के पंचनामे पूर्ण.जिल्हानिहाय नुकसान झालेले शेतकरीछत्रपती संभाजीनगर २,०५,५२७जालना १,०४,२८५परभणी २,५७,४१७हिंगोली ३,०८,४७१नांदेड ७,१२,६१०बीड ७,३३,२८६लातूर ३,८०,५११धाराशिव..२,३४,५६१.तीन जिल्ह्यांत पंचनाम्याची गती कमीमराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत नुकसानीच्या पंचनाम्याची गती कमी असल्याची स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्राच्या तुलनेत ०.२२ टक्के पंचनामे झाले. जालना जिल्ह्यात २३.३४ टक्के, बीड जिल्ह्यात ४२.२७ टक्के, लातूरमध्ये ७५.३३ टक्के, धाराशिवमध्ये ८१.३१ टक्के, परभणीत ९४.८९ टक्के पंचनामे झाले. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत मात्र नुकसानीचे संपूर्ण पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली. पंचनाम्याची गती कमी असल्याने विभागीय आयुक्तांनी यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.