Pune News: राज्यातील निवडक बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्याची अधिसूचना राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता दोनपेक्षा अधिक राज्यांतून ८० हजार टन शेतीमालाची आवक होणाऱ्या बाजार समित्या राष्ट्रीय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. .त्यानुसार मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, लातूरसह सात बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अर्थात कोणत्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा दिला, याची यादी राज्य सरकार लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे..Junnar APMC: जुन्नर बाजार समिती जागा खरेदी विरोधात शेतकरी मोर्चा.केंद्र सरकारने २०१७ मध्ये शेतीमाल आणि पशुधन विपणन मॉडेल ॲक्ट राज्यांना पाठवला होता. त्यानुसार प्रत्येक राज्याने आपापल्या कायद्यात बदल करत बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या..त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राष्ट्रीय बाजाराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव विधी व न्याय विभागाने तपासणी करून, राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविला होता. या प्रस्तावावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याने अधिसूचना जारी करण्यात आली आहे..Pune APMC: पुणे बाजार समिती प्रशासन धारेवर.या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय बाजाराचे अध्यक्ष पणनमंत्री तर उपाध्यक्षपदी पणन राज्यमंत्री असणार आहेत. तसेच ११ अधिकाऱ्यांचे संचालक मंडळ असणार असून, सहकार विभागाच्या सहनिबंधक पदाशी समकक्ष असलेल्या कृषी, पणन, सहकार किंवा महसूल विभागातील अधिकारी सचिव म्हणून काम करेल..संचालक मंडळ होणार बरखास्तअधिनियमात काहीही अंतर्भूत असले, तरी राज्य शासनाद्वारे कमल ५-१ ‘अ’ अन्वये राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराच्या स्थापनेची अधिसूचना काढण्यात आल्याबरोबर विद्यमान बाजार समिती, कार्य करण्याचे काम बंद करील आणि विद्यमान बाजार समितीचे सर्व सदस्य त्यांचे पद धारण करण्याचे बंद करतील, असे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. त्यानुसार राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या आणि गैरव्यवहारांमुळे चर्चेत असलेल्या पुणे, मुंबई या बाजार समित्यांचा समावेश राष्ट्रीय बाजारमध्ये होणार असल्याचे पणन मंत्री कार्यालयातून सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.