Panjim News : दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटर येथे शुक्रवारी (ता. १०) झालेल्या राष्ट्रीय नारळ परिषदेत व्यक्त झाला. ‘गोमन्तक’, ‘सकाळ ॲग्रेावन’ आणि गोवा सरकार यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेच्या पहिल्या सत्रात नारळ प्रकिया उद्योग आणि भविष्यातील संधी या विषयावर परिसंवाद झाला. .गोव्याचे कृषी संचालक संदीप फळदेसाई, कणकवलीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पाटील, नारळ प्रकिया उद्योजक संदीप प्रभुदेसाई, दिनेश प्रयाग, धनंजय राणे, अभिजित प्रयाग आदी या वेळी उपस्थित होते. ॲग्रोवनचे मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांनी सूत्रसंचालन केले.नारळ लागवडीतून पैसे मिळत नाहीच हे म्हणणे चुकीचे आहे. नारळामध्ये विनाउपयोगी असा एकही घटक नाही. नारळ म्हणजे खोबरे एवढाच विचार शेतकऱ्यांनी करता कामा नये. .Coconut Farming : कल्पवृक्ष गोव्यासाठी....व्हर्जीन कोकोनट ऑइल, एमसीटी ऑइल याचबरोबर सुक्या खोबऱ्यापासून तेलासह विविध उत्पादनांची निर्मिती करता येते. नीरा, काथ्या उद्योग, कोकोपीट, व्हिनेगार आदी अनेक उद्योगांची उभारणी करता येते. करवंटीपासूनही उत्पादनांची निर्मिती करता येते. खोबरेल तेल आरोग्याला पोषक आहे. त्यामुळे भविष्यात नारळ उद्योगात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. प्रकिया उद्योग उभे करून उत्पादनांचे ब्रॅंडिंग करून शेतकऱ्यांनी बाजारपेठ मिळवावी. मार्केटिंगसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करावा. .नारळ लागवडीतून एकरी लाखो उत्पन्न मिळविता येते. त्यासाठी नव्या वाटा शोधण्याची गरज आहे. असे विविध विचार सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले. गोव्याचे कृषी संचालक श्री. फळदेसाई म्हणाले, की जमीन सपाटीकरणापासून ते लागवडीपर्यंत आणि ठिबक सिंचनापासून ते पाणीसाठवण करण्यापर्यंत आणि प्रकिया उद्योग उभारण्यासाठी विविध योजना आहेत. .त्यासाठी ३५ ते ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान आहे. नारळ पिकाबरोबर आंतरपिकांसाठीही योजना आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे अधिकारी उमाकांत पाटील यांनी क्षेत्र विस्तार, उत्पादकता वाढविणे, मूल्यसाखळी हे तीन मुद्दे महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.....या मुद्यांवर झाले चर्चासत्रात मंथननारळ उद्येागातील विविध संधीयुवा शेतकऱ्यांवर मोठी जबाबदारीअभ्यासातून नव्या वाटा निवडण्यावर द्यावा भरनारळाच्या प्रत्येक भागातून आर्थिक लाभ शक्यमार्केटिंग प्रभावीपणे होण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापरअभ्यासाने नव्या वाटा निवडा.शेतकऱ्यांनी जाणल्या नारळ उद्योगातील संधीदै. ॲग्रोवन व गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. १०) पणजी (दोनापावला) येथे झालेल्या राष्ट्रीय नारळ परिषदेत विविध स्टॉलसच्या माध्यामातून संशोधन संस्थांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. विविध राज्यांतून आलेल्या शेतकऱ्यांनी नारळ पिकाचे लागवड तंत्रज्ञाना, नव्या जाती, नवी उत्पादने, संकल्पना, बाजारपेठेतील संधीं याबाबत थेट संवाद साधला. आधुनिक प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून नारळाचे मूल्यवर्धन कसे करता येईल याबाबत सखोल चर्चा झाली. मुख्य सभागृहाशेजारी असणाऱ्या दालनात हे प्रदर्शन भरले होते. अनेक शेतकऱ्यांनी नारळ शेतीतील अडचणीं सांगून शंकानिरसन करून घेतले. .Coconut Intercropping : नारळ बागेत आंतर पीकपद्धती फायदेशीर.लागवडीतील आव्हाने, दरांमधील चढ-उतार, प्रक्रिया उद्योगासाठीचे भांडवली व तांत्रिक अडचणी, सरकारकडून मिळू शकणाऱ्या योजना व अनुदान आदी विषयांसंबंधीचे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले. गोव्यासह महारष्ट्र, कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांचीही या वेळी उपस्थिती होती..परिषदेत डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, केंद्रीय कृषी संशोधन परिषद, गोवा कृषी महाविद्यालय यांच्यासह नामवंत संस्था परिषदेत सहभागी झाल्या होत्या. या संस्थांनी नारळाच्या विविध जाती व तंत्रज्ञान सांगणारे स्टॉल्स उभारले होते, नारळापासून तयार करण्यात आलेला गुलकंद, विविध प्रकारचे मोदक, नारळ तेलाचे नवे प्रकार या बाबी प्रदर्शनाच्या विशेष आकर्षण ठरल्या. ओल्ड गोवा कंपनीने तयार केलेले शुद्ध नारळ तेल, औषधी तेल, तसेच सौंदर्यप्रसाधने यांना विशेष पसंती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.