Buldana News: भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने येत्या २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शेगावमध्ये ‘राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली..श्री. जाधव म्हणाले, ‘‘आयुष विभागाच्या वतीने हा आरोग्य मेळावा संत गजानन महाराजांच्या नगरीमध्ये आयोजित केला जात आहे. उद्घाटन सोहळ्यास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, पालकमंत्री मकरंद पाटील, सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगारमंत्री आकाश फुंडकर, आ. डॉ. संजय कुटे, तसेच अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य प्रा. राकेश शर्मा आणि पद्मविभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांना देखील निमंत्रित केले आहे..National Award: एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर कंपनीला ‘स्कोच’कडून राष्ट्रीय पुरस्कार.आयुष मंत्रालयाच्या वतीने हा कार्यक्रम अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या माध्यमातून आयोजित केला जात आहे. ही संस्था १९०७ साली महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे स्थापन झाली असून, संपूर्ण देशभर कार्यरत असून आयुर्वेद क्षेत्रातील सर्वांत जुनी व मोठी संघटना आहे..National Health Mission Fund: चार लाख रुपयांचा निधी गेला परत.या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याद्वारे जनसामान्यांमध्ये आयुष चिकित्सा पद्धतींचा प्रचार करणे हा उद्देश आहे. यामध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्धा, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार आणि योग यांचा समावेश आहे..मेळाव्यादरम्यान नागरिकांची व रुग्णांची आरोग्य तपासणी केली जाईल आणि त्यांना आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून दिले जातील. तसेच, वनौषधी लागवडीसंदर्भात मार्गदर्शन देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना आपल्या शेतात वनौषधी लागवडीसाठी त्याचा उपयोग करता येईल..शेतकऱ्यांनीही या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जाधव यांनी केले. या पत्रकार परिषदेला आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, कार्यकारी अधिकारी अवधेश कुमार श्रीवास्तव देखील उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.